Join us

Healthy Fruits : डाळिंब, नासपती आणि चेरी शरीराला लाभदायक; आजारापासून रक्षण करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 18:58 IST

डाळिंब, चेरी, नासपती ही फळे शरीरात जीवनसत्व आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करतात. (Healthy Fruits)

रवी शिकारे

पावसाळा सुरू झाला की वातावरणात चढ-उतार सुरू होतो, या वातावरणाच्या बदलामुळे अनेकांना आजाराला सामोरे जावे लागते, पावसाळ्यात पचनक्रिया मंद होत असते. तसेच दूषित पाणी व अन्नामुळे याचा दुष्परिणाम मानव शरीरावर होत असतो.

या आजारापासून संरक्षण असतो. या आजारापासून संरक्षण सेवन करणे महत्त्वाचे आहे. तसेच फळे हे प्रत्येकाला खायला आवडतात. डाळिंब, चेरी, नासपती ही फळे शरीरात जीवनसत्व आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करतात. यासाठी पावसाळ्याच्या दिवसात ही फळे सेवन केली पाहिजेत.

बीडमध्ये फळे येतात कोठून?

भगवा डाळिंब, गणेश डाळिंब या जातीची फळे नाशिकहून येतात. तसेच चेरी कश्मीर, बंगाल, इराण येथून येतात, नासपती साऊथ अफ्रिका, कश्मीरवरून येतात.

डाळिंब

डाळिंब सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य मजबूत राहते, व्हिटॅमिन सी. मिळते, ॲटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. आजारापासून बचाव करण्यासाठी रोज डाळिंब खाल्ले पाहिजे. पावसाळ्यात डाळिंबाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित तक्रारी दूर होण्यास मदत होते.

चेरी

चेरी सेवन केल्याने ब्लड, शुगर प्रमाण नियंत्रित होते. हाडाची झीज कमी करण्यास मदत करते.

नासपती

नासपती हे फळ गोड आणि मधुर असे फळ आहे. हे सेवन केल्याने मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले होते. यात अँटिऑक्सिडेंटस अधिक असते. नासपतीने कर्करोग, हायपरटेंशन, डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो, अशी माहिती डॉ. हनुमंत पारखे यांनी दिली.

फळ विक्रेते म्हणतात

बाजारात डाळिंबाचे भाव १६० रुपये प्रतिकिलो आहे. दररोज ३० किलो विक्री डाळिंबाची होते. बाजाराची स्थिती चांगली राहिल्यास प्रतिदिन १ क्विंटल खप होतो. -मोहम्मद जहीर

बाजाराची स्थिती मध्यम स्वरूपाची आहे. चेरीला चांगली मागणी आहे, चेरीचा भाव प्रतिकिलो ६०० रुपये आहे. नासपती कश्मीर १०० रुपये किलो तर साऊथ आफ्रिकेचे ३०० रुपये किलो आहे.- साहिल शेख

बाजारातून आणलेली फळे घरी कोमट पाण्याने स्वच्छ धुवून खावे, पावसाळ्यात डाळिंब, चेरी, नासपती, ड्रॅगनफ्रूट, सफरचंद इ. फळे खावीत. फळे सेवन केल्याने सी व्हिटॅमिन मिळते, फळे कोणतीही असो शरीराला लाभदायक असतात. -डॉ. हनुमंत पारखे, वैद्यकीय तज्ज्ञ

टॅग्स :शेती क्षेत्रफळेआरोग्यशेतकरीशेती