Join us

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्यासाठी गुणकारी 'गवती चहा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:26 IST

Health Benefits Of Lemon Grass : गवती चहा हा एक अशी वनस्पती आहे जी चहा पिणाऱ्यांच्या चवीला एक वेगळा अनुभव देतो. केवळ चवीसाठीच नाही तर गवती चहा आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.

गवती चहा हा एक अशी वनस्पती आहे जी चहा पिणाऱ्यांच्या चवीला एक वेगळा अनुभव देतो. केवळ चवीसाठीच नाही तर गवती चहा आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.

विविधरित्या गुणकारी असलेल्या गवती चहा प्यायल्याने शरीराला होणारे काही फायदे जाणून घेऊयात.

• अँटी ऑक्सिडंट गुणधर्म - गवती चहामध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, अतिसार, आणि सूज यासारख्या समस्या टाळता येतात. पोटाशी संबंधित विविध विकारांपासून आराम मिळवण्यासाठी गवती चहा प्रभावी ठरतो.

• वजन कमी करण्यास मदत - गवती चहा शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) वाढवतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीराची चरबी कमी होण्यास मदत होते आणि ते सक्रिय ठेवते.

• रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे - गवती चहा सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे शरीर अधिक चांगले रोगांपासून संरक्षण करू शकते आणि आपली इम्युनिटी मजबूत होते.

• लोह आणि कॅल्शियमचा पुरवठा - गवती चहा आणि लिंबू एकत्र घेतल्याने शरीरातील अशक्तपणा कमी होतो. गवती चहामध्ये लोह आणि कॅल्शियमचे गुणधर्म असल्यामुळे रक्ताची कमी कमी होऊन शरीर ताजेतवाने वाटते.

• त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर - गवती चहामध्ये अ आणि सी जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे केस वाढवण्यास मदत करते आणि त्वचेला ताजेपण देतो.

• अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म - गवती चहामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. यामुळे गवती चहा सर्दी, खोकला आणि इन्फेक्शनपासून संरक्षण करतो. पावसाळ्यात गवती चहा सेवन करणं अधिक फायदेशीर ठरते.

• कोलेस्ट्रॉल कमी करणे - गवती चहाचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होतो. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि स्ट्रोकचे प्रमाणही कमी होते.

गवती चहा फक्त चवीसाठीच नाही, तर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, ज्यामुळे शरीर स्वस्थ राहते. मात्र, गवती चहा सेवन करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. मात्र वरील सर्व माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे देखील गरजेचे आहे. 

हेही वाचा : पोह्यापासून ते बियर पर्यंत ज्वारी पासून काय काय होतंय; वाचा ज्वारीच्या मूल्यवर्धित पदार्थांची सविस्तर माहिती

टॅग्स :शेती क्षेत्रआरोग्यहेल्थ टिप्सशेतीशेतकरी