Join us

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईचा जीआर आला; कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 14:20 IST

जून, २०२५ ते ऑगस्ट, २०२५ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतीचा जीआर आला आहे.

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.

जून, २०२५ ते ऑगस्ट, २०२५ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये १३३९,४९,२५,०००/- (रूपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

DBT पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्यात यावा. सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करुन संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरुन मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी.

चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तांवातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी.

एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देतांना व्दिरुक्ती होणार नाही याची तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी.

विभागवार कोणत्या जिल्ह्यात किती बाधित शेतकरी व त्यांना किती निधी मंजूर झाला आहे हे पाहण्यासाठी शासन निर्णय (पृष्ठ क्रमांक: ६ व ७) पहा.

अधिक वाचा: राज्य शिखर बँकेकडून थेट सोसायट्यांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा; राज्यातून आले केवळ ८ प्रस्ताव

टॅग्स :शेतीपाऊसपीकशेतकरीसरकारशासन निर्णयराज्य सरकारबँकतहसीलदारजिल्हाधिकारीचक्रीवादळ