मुंबई : नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
त्यानुसार आता नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आखणीत बदल करण्यात आला आहे.
त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यामुळे महामार्गाचा खर्च १ लाख १ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
आधीच्या मंजूर महामार्गाच्या तुलनेत लांबी ५४ किमीने वाढणार असून एकूण ८५६ किमी लांबीच्या मार्गाची उभारणी केली जाणार आहे.
भूमी अधिग्रहण लवकरच◼️ राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले की, राज्य सरकारने आराखड्यातील बदलांना मंजुरी दिली आहे.◼️ आता अधिग्रहणासाठी नोटिसा जारी करून संयुक्त मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल. प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण केला जाईल.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये◼️ नागपूर ते गोवा हे अंतर १८ तासांवरून ८ तासांवर येणार.◼️ महाराष्ट्रातील १३ जिल्हे, ४० तालुके, ४०० गावे जोडणार.◼️ प्रकल्पात एकूण ६ बोगदे उभारले जाणार.◼️ २१ धार्मिक स्थळांना जोडणार.
हे तालुके जोडलेहदगाव, कळमनुरी, वसमत, परभणी, औंढा नागनाथ, बार्शी, मढ, पंढरपूर, माळशिरस, माण, खटाव, कडेगाव, पलूस, इस्लामपूर, करवीर, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड.
बदल कशामुळे?शेतकऱ्यांच्या विरोधामुळे राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यातील मार्गाच्या आखणीची अधिसूचना रद्द केली होती. आता या महामार्गाची सुधारित आखणी तयार केली आहे.
अधिक वाचा: आता लाईट बिल येणार कमी; १ एप्रिलपासून १ ते १०० युनिट वापरासाठी वाचा किती असेल दर?
Web Summary : The Maharashtra government approved the revised Shaktipeeth Highway plan connecting Nagpur to Goa. The route changes impact Nanded, Hingoli, and other districts, newly including Satara. Length increases by 54km to 856km, costing ₹1.01 lakh crore. It will connect 13 districts, 40 talukas, and 400 villages, reducing travel time significantly.
Web Summary : महाराष्ट्र सरकार ने नागपुर से गोवा को जोड़ने वाले संशोधित शक्तिपीठ राजमार्ग योजना को मंजूरी दी। मार्ग परिवर्तन से नांदेड़, हिंगोली और अन्य जिले प्रभावित होंगे, जिसमें सतारा को भी शामिल किया गया है। लंबाई 54 किमी बढ़कर 856 किमी हो गई, जिसकी लागत ₹1.01 लाख करोड़ है। यह 13 जिलों, 40 तालुकों और 400 गांवों को जोड़ेगा, जिससे यात्रा का समय काफी कम हो जाएगा।