Join us

ठिबक व तुषार सिंचन तसेच वैयक्तिक शेततळे योजनेसाठी ५०० कोटी खर्चास शासनाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 17:54 IST

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना ५५% आणि इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ४५% अनुदान देण्यात येते.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना ५५% आणि इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ४५% अनुदान देण्यात येते.

सदर अनुज्ञेय अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना २५% आणि इतर शेतकऱ्यांना ३०% पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे ८०% व ७५% एकूण अनुदान देण्यात येते.

त्याचप्रमाणे दिनांक २९ जून, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये, मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेस सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता ₹५००.०० कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करुन दिलेली आहे.

सन २०२५-२६ मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यासाठी ₹५००.०० कोटी (रुपये पाचशे कोटी फक्त) निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

मंजूर कार्यक्रमाचा घटकनिहाय तपशील पुढीलप्रमाणे

अ. क्रबाबमंजूर कार्यक्रम
सुक्ष्म सिंचनकेंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सुक्ष्म सिंचन) घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदानअ) ठिबक सिंचनआ) तुषार सिंचन४००.०० कोटी
वैयक्तिक शेततळे१००.०० कोटी
 एकूण५००.०० कोटी

या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीव्दारे जमा करण्यात येणार आहे.

अधिक वाचा: Deep CCT; खोल सलग समपातळी चर कसे तयार करावेत? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :ठिबक सिंचनकृषी योजनापंतप्रधानपाणीराज्य सरकारसरकारशेतकरीशेतीपीक