Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज राहुरी कृषी विद्यापीठाचे १८ नवीन वाण देशपातळीवर प्रसारित

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज राहुरी कृषी विद्यापीठाचे १८ नवीन वाण देशपातळीवर प्रसारित

Good News for Farmers 18 New Varieties of Rahuri Agricultural University Released Nationwide | शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज राहुरी कृषी विद्यापीठाचे १८ नवीन वाण देशपातळीवर प्रसारित

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज राहुरी कृषी विद्यापीठाचे १८ नवीन वाण देशपातळीवर प्रसारित

MPKV Rahuri New Varieties महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांच्या १८ वाणांना नवी दिल्ली येथील कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचित करण्यात आले आहे.

MPKV Rahuri New Varieties महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांच्या १८ वाणांना नवी दिल्ली येथील कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचित करण्यात आले आहे.

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांच्या १८ वाणांना नवी दिल्ली येथील कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचित करण्यात आले आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठांपैकीराहुरी कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय पातळीवर सर्वात जास्त वाण प्रसारित झाले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाला या निमित्ताने यश प्राप्त झाले आहे.

प्रसारित केलेल्या पिकांचे वाण
भात - फुले कोलम
मका - फुले उमेद व फुले चॅम्पियन
ज्वारी - फुले पूर्वा
करडई - फुले भूमी
तूर - फुले पल्लवी
मूग - फुले सुवर्ण
उडीद - फुले राजन
राजमा - फुले विराज
ऊस - फुले १५०१२
घेवडा - फुले श्रावणी
गहू - फुले अनुराग
कापूस - फुले शुभ्रा
टोमॅटो - फुले केसरी
चेरी टोमॅटो - फुले जयश्री
घोसाळे - फुले कोमल
वाल - फुले सुवर्ण
मेथी - फुले कस्तुरी

सन २०२४ या वर्षात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सर्वांत जास्त वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित झाले आहेत. विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवाची बाब आहे. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकरीभिमुख संशोधन करीत आहेत. - डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Web Title: Good News for Farmers 18 New Varieties of Rahuri Agricultural University Released Nationwide