Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ghonas Snake : विषारी घोणस, फुरसे ह्या सापांचा थंडीतच का वाढतो धोका? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:25 IST

Ghonas Sap थंडीपासून बचावासाठी स्वेटर, मफलर, कान टोपी हे वापरणे आवश्यक झाले असले तरी याच थंडीचा फायदा घेत काही विषारी सापांचा धोका वाढत आहे.

सध्या थंडीची लाट आली आहे. परिसरामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. थंडीपासून बचावासाठी स्वेटर, मफलर, कान टोपी हे वापरणे आवश्यक झाले असले तरी याच थंडीचा फायदा घेत काही विषारी सापांचा धोका वाढत आहे.

थंडी सुरू होताच ग्रामीण भागात अतिविषारी मानल्या जाणाऱ्या घोणस, फरूड (फुरसे) यांसारखे विषारी साप रस्त्याच्या बाजूला किंवा मानवी वस्तीजवळ दिसण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. थंडीत ते उबदार जागा शोधत रस्त्यावरच पडत आहेत.

घोणस हा भारतातील 'बिग फोर' विषारी सापांपैकी एक आहे, जो चावल्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. थंडीची चाहुल लागताच अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला आणि घरांच्या आसपास विषारी साप, विशेषतः घोणस, फरूड दिसण्याच्या घटना वाढत आहेत.

साप थंडीमध्ये 'शीतनिद्रे'साठी किंवा फक्त उबदार जागेच्या शोधात बिळातून बाहेर येतात आणि त्यामुळे मानवी वस्तीजवळ येतात.

अशावेळी घाबरून न जाता, योग्य ती दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंडीमुळे सापांची हालचाल मंदावते. पण, ते धोकादायक नसतात, असा गैरसमज करून घेऊ नका.

घोणस हा भारतातील 'बिग फोर' विषारी सापांपैकी एक आहे, जो चावल्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. विशेष थंडीच्या दिवसात रस्त्याच्या बाजूने चालत असताना काळजी घेणे आवश्यक आहे.

महत्वाचे◼️ घराच्या आजूबाजूला अनावश्यक कचरा, लाकडांचे ढिगारे, पालापाचोळा किंवा जुने सामान ठेवू नका.◼️ हे सापांना लपण्यासाठी सोयीस्कर आहे.◼️ रात्री घराबाहेर पडताना टॉर्चचा वापर करा.◼️ घरात, गोठ्यात किंवा साठवणीच्या जागी काही ठेवण्यापूर्वी ती जागा तपासा.◼️ शेतात काम करताना किंवा रात्री बाहेर पडताना बूट आणि लांब पँट वापरा.◼️ साप दिसल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. शांतपणे दूर व्हा.◼️ साप चावल्यास घाबरू नका. रुग्णाला धीर द्या.◼️ कोणत्याही घरगुती उपचारांवर वेळ न घालवता त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे घेऊन जा.

अधिक वाचा: जमिनीच्या वाटणीपत्रास मिळणार आता कायदेशीर आधार; भूमिअभिलेख विभागाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

टॅग्स :सापमंदिरहवामान अंदाजहॉस्पिटलशेतीशेतकरीडॉक्टर