भीमगोंडा देसाईकोल्हापूर : शेतजमीन पोट हिस्सा मोजणी व नकाशा अद्ययावतीकरणासाठी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याची निवड भूमी अभिलेख प्रशासनाने केली आहे.
यांतर्गत पुढील आठवड्यात गडहिंग्लजमधील कसबा नूल, निलजी, मुत्नाळ, हिटणी, खणदाळ या गावांत प्रत्यक्ष शेत जमिनींची मोफत मोजणी करून कमीत कमी दहा गुंठे बागायती आणि २० गुंठे जिरायत जमिनीचे पोटहिस्से आणि नकाशे तयार करण्यात येणार आहे.
प्रत्येक हिश्शाला आधारसारखा अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक (यूएलपीएन) मिळणार आहे. यातून जेवढा नकाशा तेवढाच सातबारा तयार करण्यात येणार आहे.
परिणामी शेतीच्या हद्दीवरून, क्षेत्रावरूनचे वाद संपणार आहेत, असे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे. नकाशा आणि सातबाऱ्यातील क्षेत्रात तफावत असल्याने केंद्र आणि राज्याच्या शेतीसंबंधीच्या योजना राबवताना अडचणी येत आहेत.
यामुळे केंद्र शासनाच्या विशेष साहाय्य योजनेंतर्गत पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक पोटहिश्शाला यूएलपीएन नंबर दिला जाणार आहे.
सध्याचा गट, सर्व्हे नंबर नाहीसा हा युनिक नंबरच जमिनीची ओळख बनणार आहे. जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यापासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे.
मोजणीचे काम असे होईल◼️ पोटहिस्सा मोजणीच्या दिनांकास सातबारामधील नावानुसार पोटहिस्सा मोजणी होणार.◼️ जाग्यावरील सर्व्हे नंबर, गटनंबरचे मूळ कायम दगड आणि जमिनीसंबंधी डिजिटल डेटा विचारात घेण्यात येणार आहे.◼️ नव्याने तयार झालेला पोटहिस्सा मूळ सर्व्हे, गटनंबरच्या नकाशावर जीआएस प्लाटफार्मवर सुपर इम्पोजेशन तयार होणार जमीन मालकीवरून न्यायालयात वाद असेल, तर मोजणी होणार नाही.
मोजणीत अचूकता◼️ अत्याधुनिक रोव्हरच्या साहाय्याने मोजणी केली जाणार असल्याने क्षितीज समांतरापासून पाच सेमीपर्यंतची अचूकता येणार आहे.◼️ उभी अचूकता दहा सेमीपेक्षा कमी असणार आहे. यामुळे नकाशा आणि सातबारातील क्षेत्राचा मेळ बसवणे शक्य होणार आहे.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निश्चिती◼️ पोट हिस्सा मोजणीवेळी संबंधित गावातील सरकारी, गायरान, स्मशानभूमीच्या जमिनीचीही मोजणी होणार आहे.◼️ या जमिनीवरील अतिक्रमणही निश्चित करण्यात येणार आहे. याचा अहवाल भूमी अभिलेख प्रशासन महसूल प्रशासनास देणार आहे.
शेतजमिनीचा मोफत पोटहिस्सा मोजणी, नकाशा अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. जमीनधारकांनी प्रत्यक्ष हजर राहून जमिनीची वहिवाट, जुन्या हद्दी, ढेपण, दगड दाखवाव्यात. - शिवाजीराव भोसले, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, कोल्हापूर
अधिक वाचा: राज्यात ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी; आता दस्त नोंदणीला किती रुपये?
Web Summary : Kolhapur's Gadhinglaj taluka selected for free land measurement, map updates. Ten-gunta plots get unique IDs, resolving boundary disputes and aiding government schemes. Accurate measurements using advanced tech ensure precise land records.
Web Summary : कोल्हापुर के गडहिंग्लज तालुका का मुफ्त भूमि माप, मानचित्र अद्यतन के लिए चयन। दस गुंठा भूखंडों को अद्वितीय आईडी मिलेगी, सीमा विवादों का समाधान होगा और सरकारी योजनाओं में सहायता मिलेगी। उन्नत तकनीक से सटीक माप सुनिश्चित।