lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > कृषी विभागात होणार मोठा बदल! यंदा चार संचालक होणार निवृत्त; कुणाची लागणार वर्णी?

कृषी विभागात होणार मोठा बदल! यंदा चार संचालक होणार निवृत्त; कुणाची लागणार वर्णी?

Four new directors to come in the Department of Agriculture! Who needs the character? | कृषी विभागात होणार मोठा बदल! यंदा चार संचालक होणार निवृत्त; कुणाची लागणार वर्णी?

कृषी विभागात होणार मोठा बदल! यंदा चार संचालक होणार निवृत्त; कुणाची लागणार वर्णी?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या बदल्या आणि प्रमोशन झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या बदल्या आणि प्रमोशन झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर येणाऱ्या काही दिवसांत कृषी विभागातील काही अधिकारी निवृत्त होणार असून त्यांच्या पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

दरम्यान, कृषी विभागात आयुक्तांच्या नंतर फलोत्पादन, आत्मा, प्रक्रिया नियोजन, विस्तार प्रशिक्षण आणि खते व गुणनियंत्रण संचालक आहेत. यातील आत्मा विभागाचे संचालक, विस्तार प्रशिक्षण विभागाचे संचालक, प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक आणि खते व गुणनियंत्रण विभागाचे संचालक येणाऱ्या काळात निवृत्त होणार आहेत.

विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक येणाऱ्या एका महिन्यात तर खते व गुणनियंत्रण विभागाचे संचालक ऑक्टोबरदरम्यान निवृत्त होणार असल्याची माहिती आहे. तर प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक आणि आत्माचे संचालक दोन महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये निवृत्त होणार असून त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

कृषी विभागातील हे सर्वांत महत्त्वाचे विभाग असून याकडे अनेक अधिकाऱ्यांचे लक्ष असते. तर या पदावर येण्यासाठी अनेकदा राजकीय हस्तक्षेपही आपल्याला दिसून येतो. या जागेवर येण्यासाठी विभागीय सहसंचालक, विभागातील सहसंचालक यांना प्राधान्य दिले जाते. त्यातही विविध अधिकाऱ्यांची रस्सीखेच असल्याचे दिसून येते. यानंतर कृषी विभागात मोठा बदल होणार असून नव्या अधिकाऱ्यांकडे या संचालकपदाच्या जबाबदाऱ्या येणार आहेत.

Web Title: Four new directors to come in the Department of Agriculture! Who needs the character?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.