Join us

खतांच्या वापरात पाचपट वाढ; किती खते वापरतोय आपण? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:21 IST

देशात शेतीसाठी खतांचा वापर गेल्या चार दशकांत पाचपट वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. १९८१-८२ मध्ये केवळ ६०.६४ लाख टन खतांचा वापर होत होता.

महेश घोराळेमुंबई : देशात शेतीसाठी खतांचा वापर गेल्या चार दशकांत पाचपट वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. १९८१-८२ मध्ये केवळ ६०.६४ लाख टन खतांचा वापर होत होता.

तो २०२०-२१ मध्ये ३२५.३६ लाख टनांपर्यंत गेला. २०२३-२४ मध्ये किंचित कमी होऊन ३०६.४२ लाख टनांवर आला. याच बरोबर देशात खताचे उत्पादन, आयातही वाढली आहे.

उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी खतांचा वापर करत असल्याने मागणी वाढत आहे. काही दशकांत देशातील अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झाली. त्यात रासायनिक खते, सुधारित बियाणे आणि सिंचन यांचा निश्चितच मोठा वाटा आहे.

१७१ गावात पाणी विषारीयुरिया खताच्या अतिवापराने जळगावच्या १७१ गावांमधील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता घसरली आहे. या पाण्यात 'नायट्रेट'चे प्रमाण मर्यादेबाहेर असल्याचे भुजल सर्वेक्षण अहवालात नुकतेच उघड झाले. तपासणी अहवालात या पाण्याच्या नमुन्यांमध्ये 'नायट्रेट'चे प्रमाण कमाल मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील केसगळतीच्या प्रकरणातही तज्ज्ञांनी खताच्या बेसुमार वापरावर बोट ठेवत धक्कादायक निरीक्षणे नोंदविली आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती काय सांगते?वर्ष - खत वापर (हजार टन)२०१९-२० : २,९४१.२९२०२०-२१ : ३,४१३.६०२०२१-२२ : ३,१३५.५७

मराठवाडा, विदर्भातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटले. आधी खतांमुळे उत्पादन वाढले, आता अपेक्षित उत्पादन वाढत नाही. विदर्भात कापूस, सोयाबीन उत्पादन काही भागांत कीड रोगांचे संकट वाढले आहे, असे तज्ञांचे मत आहे.

असा वाढला देशात खतांचा वापर (लाख टन)

वर्षखत वापरउत्पादनआयात
१९८१-८२६०.६४४०.९३२०.४१
१९८८-८९११०.४०८९.६४१६.०८
१९९७-९८१६१.८८१३०.६२३१.७४
२००५-०६२०३.४११५५.७६५२.५३
२००८-०९२४९.०९१४३.३४१०१.५१
२०२०-२१३२५.३६१८४.५४१०८.४६
२०२३-२४३२५.३६२१९.४८९६.४०

एका हेक्टरला किती खते?वर्ष : वापर (किलो)२००१-०२ : ९२.३३२००२-०३ : ९२.५५२००३-०४ : ८८.५७२००४-०५ : ९६.२७२००५-०६ : १०५.५३२००६-०७ : १०५.५५२००७-०८ : ११५.२७२००८-०९ : १२७.५३२००९-१० : १४०.१५२०१०-११ : १४२.५२२०११-१२ : १४२.५२२०१२-१३ : १३१.४६२०१३-१४ : १२१.८३२०१४-१५ : १२८.९४२०१५-१६ : १३५.७६२०१६-१७ : १२३.४१२०१७-१८ : १३२.५७२०१८-१९ : १३७.१५२०१९-२० : १३३.४४२०२०-२१ : १३७.१५२०२१-२२ : १३७.१५२०२२-२३ : १३७.१५२०२३-२४ : १३७.१५(स्रोत: कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय)

अधिक वाचा: आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नसलेला एकमेव व्यवसाय म्हणजे 'शेती'; यात होईल का बदल?

टॅग्स :खतेशेतीशेतकरीपीकसेंद्रिय खतमराठवाडाविदर्भ