Lokmat Agro >शेतशिवार > Fertilizer Demand : यंदा खरीप हंगामासाठी किती मे. टन खतांची आवश्यकता; मागणीत कशी झाली वाढ ते वाचा सविस्तर

Fertilizer Demand : यंदा खरीप हंगामासाठी किती मे. टन खतांची आवश्यकता; मागणीत कशी झाली वाढ ते वाचा सविस्तर

Fertilizer Demand: latest news How many million tons of fertilizers are required for this Kharif season; Read in detail how the demand has increased | Fertilizer Demand : यंदा खरीप हंगामासाठी किती मे. टन खतांची आवश्यकता; मागणीत कशी झाली वाढ ते वाचा सविस्तर

Fertilizer Demand : यंदा खरीप हंगामासाठी किती मे. टन खतांची आवश्यकता; मागणीत कशी झाली वाढ ते वाचा सविस्तर

Fertilizer Demand : खरीप हंगाम (Kharif season) महिन्यावर आला असल्याने कृषी विभागाकडून खरीप हंगामपूर्व तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने शासनाकडे ३ लाख १ हजार ४६८ मे. टन रासायनिक खतांची मागणी नोंदविली आहे. (Fertilizer Demand)

Fertilizer Demand : खरीप हंगाम (Kharif season) महिन्यावर आला असल्याने कृषी विभागाकडून खरीप हंगामपूर्व तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने शासनाकडे ३ लाख १ हजार ४६८ मे. टन रासायनिक खतांची मागणी नोंदविली आहे. (Fertilizer Demand)

शेअर :

Join us
Join usNext

छत्रपती संभाजीनगर :

खरीप हंगाम महिन्यावर आला असल्याने कृषी विभागाकडून खरीप हंगामपूर्व (Kharif season) तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने शासनाकडे ३ लाख १ हजार ४६८ मे. टन रासायनिक खतांची मागणी नोंदविली आहे.(Fertilizer Demand)

मागील वर्षीच्या वापराच्या तुलनेत ३४ हजार ९५७ मे. टनांनी अधिक मागणी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. दरवर्षी ७ जून अर्थात मृग नक्षत्राला सुरुवात होताच शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात होते.(Fertilizer Demand)

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून मे महिन्यातच रासायनिक खतांच्या खरेदीची शक्यता आहे.(Fertilizer Demand)

ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाकडून मार्चपूर्वीच मागील पाच वर्षांतील खतांच्या मागणीचा आढावा घेत खरीप हंगामासाठी (Kharif season) रासायनिक खते, कीटकनाशक आणि बियाणांची मागणी कृषी आयुक्तालयास कळविली आहे.(Fertilizer Demand)

मागील पाच वर्षांचा खताचा सरासरी वापर विचारात घेऊन कृषी विभागाने २०२५-२६ साठी ३ लाख १ हजार ४६८ मे. टन खतांची मागणी नोंदविली आहे.

मागील वर्षीच्या कोट्यातील १ लाख १४ हजार ३५९ मे. टन शिल्लक आहेत. गतवर्षी खरीप हंगामात(Kharif season) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २ लाख ८० हजार २६४ मे. टन खताचा वापर केला होता. २ लाख ८० हजार २६४ मे. टन खताचा वापर गतवर्षी खरीप हंगामात आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला होता. (Fertilizer Demand)

कोणते खत मिळणार? (मे. टन)

युरिया१,१२,५२१
डीएपी२५,००७
पोटॅश३,६४०
संयुक्त खते८१,२०,०००
एसएसपी४०,३००

रासायनिक खतांची मागणी वाढतेय

घटत असलेल्या पशुधनामुळे शेणखताचा तुटवडा असतो. काडीकचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. पर्यायाने शेतकरी सेंद्रिय खताऐवजी रासायनिक खतालाच प्राधान्य देतात. यामुळे दरवर्षी रासायनिक खतांची मागणी वाढतच आहे. - प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

हे ही वाचा सविस्तर : 'HTBT' Bogus Seeds: 'एचटीबीटी' बियाण्यांच्या विक्रीत 'या' चार राज्यांतील दलालांचे कनेक्शन वाचा सविस्तर

Web Title: Fertilizer Demand: latest news How many million tons of fertilizers are required for this Kharif season; Read in detail how the demand has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.