जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील विहिरींची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरची लागवडीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.
पाण्याअभावी शेतकऱ्यांना शेती नियोजन बदलावे लागत असून, अनेकांनी आता पहिल्या पावसानंतरच मिरची व खरिपातील कपाशी पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भूजल पातळीवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी बहुतांश विहिरींनी तळ गाठला असून, अनेक ठिकाणी मोटारी बंद पडल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे.
विशेषत मिरचीसारख्या पाण्याची अधिक गरज असलेल्या पिकांची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी धोक्याचे ठरत आहे. धरण परिसरातील काही शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये अद्याप काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे अशा भागात मर्यादित क्षेत्रावर मिरची लागवड सुरू असल्याचे दिसत आहे.
मात्र, इतर बहुतांश गातांमध्ये पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी लागवड टाळली आहे. मिरची लागवडीसाठी रोपे, ठिबक सिंचन, मजुरी, खते व औषधांवर मोठा खर्च करावा लागतो.
अशा परिस्थितीत पाणी उपलब्ध न झाल्यास संपूर्ण गुंतवणूक धोक्यात येण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे जोखीम टाळण्यासाठी अनेकांनी खरीप हंगामाची ताट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.
काही शेतकरी पहिल्या पावसानंतर मिरचीसोबत कपाशी, सोयाबीन व इतर खरीप पिकांची लागवड करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, तालुक्यात वाढत्या पाणीटंचाईमुळे शेतक-यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून, पाठसावरच आगामी हंगामाचे गणित अवलंबून असल्याचे चित्र आहे.
भोकरदन तालुक्यात हजारो विहिरींनी पाणीपातळी गाठली आहे. मात्र, धरण परिसरातील विहिरींना मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.
भोकरदन तालुक्यातील विविध गावांवर पाणीसंकट
जूनमध्ये चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली होती. परिणामी, पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी नागरिकांची अपेक्षा होती. परंतु, जालना जिल्ह्याचे तापमान ४१ अंशावर गेल्याने बाष्पीभवन होऊन तलावातील साठा कमी झाला, परिणामी, विविध गायांवर पाणीसंकट निर्माण होत आहे.