Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > ई - पीक पाहणीकडे शेतकऱ्यांची पाठ, तांत्रिक समस्यांमुळे बळीराजा हैराण

ई - पीक पाहणीकडे शेतकऱ्यांची पाठ, तांत्रिक समस्यांमुळे बळीराजा हैराण

Farmers turn their backs on e-crop inspection, Baliraja is puzzled by technical problems | ई - पीक पाहणीकडे शेतकऱ्यांची पाठ, तांत्रिक समस्यांमुळे बळीराजा हैराण

ई - पीक पाहणीकडे शेतकऱ्यांची पाठ, तांत्रिक समस्यांमुळे बळीराजा हैराण

दोन महिन्यात ४०.५० टक्केच नोंदणी पूर्ण

दोन महिन्यात ४०.५० टक्केच नोंदणी पूर्ण

महसूल कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने मागील दोन वर्षापासून ई- पीक पाहणी अॅपद्वारे पिकांची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अॅपमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे दोन महिन्यात ४०.५० टक्केच नोंदणी पूर्ण होऊ शकली आहे.

जिल्ह्यातील ६ लाख ५८ हजार ६०२ हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ६५ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. पुन्हा २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, यालाही प्रतिसाद मिळाला नाही.

ई-पीक पाहणीद्वारे नोंद झालेल्या क्षेत्राची टक्केवारी

जाफराबाद ५३. ९७
मंठा ६७. ९३
भोकरदन ४२. २०
परतूर ३८. ७५
जाफराबाद५३. ९७.
जालना ३५. ५९
घनसावंगी ३५. ४७

मुदवाढ देण्याची मागणी

ई-पीक पाहणीसाठी २५ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत शंभर टक्के नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. यामुळे ई-पीक पाहणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

अनेक अडचणींचा सामना

  • जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाइल अॅपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न  जाता स्वतःच्या मोबाइलवरून विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे.
  • महसूल विभागाचा ई-पीक पाहणी योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मात्र अशी नोंद करतांना अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
  • शेतकऱ्यांकडे स्मार्टफोनची सुविधा उपलब्ध नाही. तसेच ज्यांच्याकडे मोबाइल आहेत.त्यांना अचूक पद्धतीने पिकांची नोंदणी शक्य होत नाही.
  • पिकांची नोंदणी करण्यासाठी अक्षांश आणि रेखांश अचूक पद्धतीने नोंद करणे आवश्यक असते. मात्र अशी नोंद करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागता आहे.
  • तसेच अॅपमधील यादीत असणारे पीक शोधण्यासाठी देखील अनेक शेतकऱ्यांचा गोंधळ उडत आहे.

Web Title: Farmers turn their backs on e-crop inspection, Baliraja is puzzled by technical problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.