Join us

शेतकऱ्यांचे कष्ट होणार कमी; कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीला ठरणार वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 22:01 IST

Artificial Intelligence : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक अशी प्रणाली आहे. ज्यात ज्यामध्ये संगणकांद्वारे विविध माहिती गोळा केली जाते आणि त्याचा वापर एखाद्या विशिष्ट कामासाठी केला जातो. शेती क्षेत्रात या प्रणालीचा वापर शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक अशी प्रणाली आहे. ज्यात ज्यामध्ये संगणकांद्वारे विविध माहिती गोळा केली जाते आणि त्याचा वापर एखाद्या विशिष्ट कामासाठी केला जातो. शेती क्षेत्रात या प्रणालीचा वापर शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.

अलीकडे शेती तोट्याची अन् प्रचंड मेहनतीची म्हणून गणली जाते. अशावेळी येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शेतीमध्ये अनेक सुधारणा होऊन शेती अधिक सोपी आणि फायदेशीर होईल.

शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे शेतकऱ्यांची विविध कामे सोप्या आणि प्रभावी पद्धतीने करण्यास मदत करणारी एक तंत्रज्ञान प्रणाली. यामध्ये पीक किड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य यांसारख्या कामांमध्ये एआय शेतकऱ्यांची मदत करणार आहे.

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कशा प्रकारे उपयोगी ठरेल?

शेतीच्या कामामध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. यामध्ये पाणी व्यवस्थापन, किड-रोग नियंत्रण, आणि जमिनीचे आरोग्य राखणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. एआयच्या मदतीने यासाठी नवे उपाय शोधता येतात. शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य सूचना मिळाल्यामुळे त्यांना हे सर्व कामे अधिक सोप्या आणि प्रभावी पद्धतीने करता येतात.

एकंदरीत कृत्रिम बुद्धिमत्ता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवरील समस्यांवर योग्य मार्गदर्शन पुरवते ज्यामुळे त्यांचे उत्पादन आणि नफा वाढू शकतो.

डॉ. दिपक बोरणारे उपसंचालक व विभागप्रमुख(कृषी अभियांत्रिकी विभाग, एम आय टी, छत्रपती संभाजीनगर).

हेही वाचा : विविध आरोग्याच्या समस्येवर चिंच आहे रामबाण उपाय; वाचा चिंचेचे आरोग्यदायी फायदे

टॅग्स :शेती क्षेत्रआर्टिफिशिअल इंटेलिजन्सशेतीशेतकरीपाणीपीक व्यवस्थापनतंत्रज्ञान