Join us

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याला शोधले दुबईचे मार्केट; २९ टन कांदा दुबईला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:30 IST

Onion Dubai Market दहिगाव बोलका परिसरातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दहिगाव साई माउली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून शेतात पिकवलेला निर्यातक्षम कांदा थेट दुबईला विक्रीसाठी पाठविला आहे.

दिनेश जोशीदहिगाव बोलका परिसरातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दहिगाव साई माउली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून शेतात पिकवलेला निर्यातक्षम कांदा थेट दुबईला विक्रीसाठी पाठविला आहे.

दुबईत तरी चार पैसे जास्त मिळतील अशी अपेक्षा येथील शेतकऱ्यांना आहे. सध्या राज्यात तसेच देशात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत.

कांद्यासाठी झालेला खर्चही वसूल होण्याची शाश्वती नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी पुणेच्या सल्ल्याने कांदा दुबई येथे पाठविण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कांद्याला कुठे चांगला दर मिळेल याविषयी चाचपणी करून शेतकऱ्यांना दुबई येथे कांदा विक्रीसाठी पाठविण्याचा सल्ला दिला.

येथील ५ शेतकऱ्यांनी सुमारे २९ टन कांदा रविवारी (दि.६) कंटेनरच्या माध्यमातून मुंबई येथील बंदरात पाठविला आहे. पुढील पाच ते सहा दिवसात हा कांदा दुबईत पोहोचेल त्यासाठी शेतकऱ्यांना किलोमागे ११ ते १२ रूपये खर्च येणार आहे.

काबाड कष्ट करून कांदा पिकवायचा आणि मातीमोल भावाने विकायचा हे पटत नव्हते. गावातील दहिगाव साई माउलीने त्यांच्या माध्यमातून कांदा दुबईला विक्रीसाठी पाठविण्याची व्यवस्था केल्याचे समजले. तेथे कांदा पाठविण्याचा निर्णय घेतला. - संजय मिसाळ, कांदा उत्पादक

सध्या राज्यात तसेच देशात कांद्याला फारशी मागणी नाही त्यामुळे दर कोसळले आहेत. शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळावा, या माध्यमातून परदेशात निर्यातक्षम कांदा पाठविण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. २० किलोच्या गोणीतून कांदा पाठवण्याची व विक्रीची व्यवस्था कंपनीने केली आहे. - बाबासाहेब लांडगे, संचालक, साई माउली प्रोड्यूसर कंपनी

अधिक वाचा: यंदाच्या खरीपात सोयाबीनच्या अधिक उत्पादनासाठी टॉप १० जाती कोणत्या? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :कांदाअहिल्यानगरशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डदुबई