Farmer Success : शिरूर कासार तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कासळवाडीच्या (Kasalwadi) लाल मातीत (red soil) केशर आंब्याचा (Kesar Mango) सुगंध दरवळत आहे. ज्या शेतात हरळी नीट येत नाही, त्या शेताला कोकणी आंब्याचे वैभव प्राप्त झाले असून, शेतकरी सुद्धा मालामाल झाला आहे.
शिरूरपासून जवळच डोंगरकुशीत कासळवाडी आहे. येथील डॉ. सुनील कासुळे यांनी वैद्यकीय व्यवसाय करताना आपल्या शेतात पाच वर्षांपूर्वी केशर, हापूस, पायरी, दशेरी, तोतापुरी, नीलम, लालबाग अशा जातीच्या आंबा रोपांची लागवड केली. शेततलाव, बोअर, विहीर अशा माध्यमातून ठिबक पद्धतीने व सौरऊर्जेच्या मदतीने पाणी व्यवस्थापन केले. (Kesar Mango)
तीन वर्षांपासून आंबा बागेला फळ येत असून, जवळपास ५३० झाडांना अडीच ते तीन टन माल यावर्षी अपेक्षित आहे. दोन आठवड्यांपासून आंबा पाडाला लागला असून, त्याची तोड व विक्री सुरू आहे. (Kesar Mango)
शेणखतावरची बाग लाल मातीत असल्याने आंब्याला गोडवा अधिक असतो. प्रति किलो ८० रुपये भावाने विक्री केली जात असून, ग्राहक थेट बागेतून कच्चा आंबा नेऊन घरी पिकवत आहेत. यंदा बागेतील झाडांना समाधानकारक फळे लगडली असून, जवळपास अडीच लाखांचे उत्पादन हाती येईल, असा अंदाज डॉ. कासुळे यांनी व्यक्त केला.
कासाळवाडीने 'पाणी अडवा, पाणी जिरवा' ही मोहीम लोकसहभागातून राबविली होती. शिवाय डोंगरावरून वाहून जाणारे पाणी जागोजागी तलाव करून अडवले. यातून विहिरी, बोअरला समाधानकारक पाणी मिळाले. त्याचा पुरेपूर वापरदेखील केला जात असून, शेतकरी वेगवेगळे वाण घेत आहेत.
परागीकरणासाठी अन्य फळझाडे!
* परागीकरणाला पोषक वातावरण म्हणून या आंबा बागेत चिकू, जांभूळ, लिंबोणी, केळी, संत्रा, मोसंबी, पेरू, नारळ, फणस, सफरचंद, अंजिर, पपई ही फळझाडे आहेत.
* याशिवाय दीड एकरवर सीताफळ लागवड केली आहे. मोसमानुसार फळ मिळत असल्याने चिमणी, पाखरांचा झाडांवर चिवचिवाट ऐकायला मिळतो.
आंतरपीक घेतले जाते !
आंब्याचा हंगाम संपला की, या बागेत पावसाळी भुईमूग आणि उन्हाळी बटाटा हे आंतरपीक घेऊन खर्चाला हातभार लावला जातो.
ताक-गुळाची फवारणी !
आंबा मोहराला आला की, परागीकरणाचे माध्यम असलेली मधमाशी आकर्षित करण्यासाठी ताक आणि गुळाची फवारणी केली जात असल्याने मधमाशांचे प्रमाण अधिक असते व ते बागेला फायदेशीर ठरते.
लाल मातीत आंब्याचा सुवास
शिरूर कासार तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कासळवाडीच्या डोंगरकुशीत हरळीही नीट न येणाऱ्या लाल मातीतील शेतात, डॉ. सुनील कासुळे यांनी केशर, हापूस, पायरी, दशेरी, तोतापुरी, नीलम अशा जातींची आंब्याची बाग फुलवली.
शाश्वत सिंचनासाठी जलव्यवस्थापन
शेततळे, बोअर, विहीर आणि सौरपंपाच्या मदतीने ठिबक सिंचनाची अंमलबजावणी. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' मोहिमेतून डोंगरावरील वाहते पाणी तलावांमध्ये अडवून विहिरीला भरपूर पाणी.
भरघोस उत्पन्नाची आशा
यंदा अडीच ते तीन टन उत्पादनाची अपेक्षा, ८० रुपये किलोने विक्री, अंदाजे २.५ लाखांचे उत्पन्न ग्राहक थेट बागेत येऊन आंबा खरेदी करत असल्याचे कासुळे यांनी सांगितले.
डॉ. सुनील कासुळे हे आपल्या शेतात अनेक नवं नवीन प्रयोग जिद्द आणि चिकाटीने करत आहे. त्याचमुळे कासळवाडीतील लाल मातीला 'केशर'चा सुगंध त्यांना लाभला अन् नव्या आशेचा किरण दिसला असल्याचे ते सांगतात.