Join us

Farmer id : राज्यात 'फार्मर आयडी'च्या नोंदणीत हा जिल्हा सर्वात पुढे; कुठल्या जिल्ह्यात किती नोंदणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:07 IST

राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक, पॅनकार्डप्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक, पॅनकार्डप्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

महसूल व कृषी विभागाच्या वतीने 'फार्मर आयडी' काढण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असून, राज्यात आतापर्यंत ४४ लाख २२ हजार १८२ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा आघाडीवर आहे, तर जळगाव दुसऱ्या व कोल्हापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, बँकेचे खाते नंबर आणि शेतीची सर्व माहिती एकत्रित असावी, हा उद्देश असून, राज्य सरकारच्या अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत ही प्रक्रिया राबवली जात आहे. शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहेत.

'फार्मर आयडी'ची उपयुक्ततासरकारी योजनांचा लाभ सहजरीत्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. मध्यस्थांची भूमिका कमी करणे. आयडी तयार झाल्यानंतर, शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही. विविध योजनांमधील भ्रष्टाचारापासूनही मुक्तता मिळेल. 

पीएम किसान योजनेची पडताळणी सोपीकेंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पीएम किसान योजनेतून देते. फार्मर आयडीमुळं अर्ज सादर करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असल्याची खात्री होते. त्यामुळे पडताळणी देखील सोपी होते. 

जिल्हानिहाय फार्मर आयडीची नोंदणीजिल्हा - शेतकरीअहिल्यानगर - ३,२०,०७८जळगाव - २,८४,५४७कोल्हापूर - २,७६,९२०सातारा - २,७४,९४२नाशिक - २,६७,०१८पुणे - २,२६,११५बुलढाणा - १,९३,०१९बीड - १,८४,८३५अमरावती - १,५५,८४९सोलापूर - १,५५,१५५सांगली - १,५२,३८९यवतमाळ - १,४४,२५४संभाजीनगर - १,३१,५२८जालना - १,२५,१४९गोंदिया - १,१४,५५०नांदेड - १,०४,१४७चंद्रपूर - १,०२,५१३अकोला - ९३,२२८धाराशिव - ९२,८३४ परभणी - ९१,७५२ धुळे - ९१,१७८ वाशिम - ८८,१०३ लातूर - ८२,३९७भंडारा - ८०,८५० हिंगोली - ७८,६६५ वर्धा - ७७,७३० नागपूर - ७६,६६५ गडचिरोली - ७३,४४१ नंदूरबार - ६३,६७६ रत्नागिरी - ५६,१६६ पालघर - ५१,९४० रायगड - ४७,२८६ ठाणे - ३७,७४८ सिंधुदुर्ग - २४,८४९ मुंबई - ३२३

अधिक वाचा: Farmer id : घरबसल्या आता तुमच्या मोबाईलवर काढता येणार फार्मर आयडी; लवकरच होणार हा बदल

टॅग्स :शेतकरीमहसूल विभागशेतीपीकअहिल्यानगरकोल्हापूरकेंद्र सरकारराज्य सरकारसरकारजळगाव