Join us

Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:30 IST

ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे.अशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर फार्मर आयडी नंबरचा मेसेज यायला सुरवात झाली आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक यापुढे बंधनकारक केला आहे. यासाठी अॅग्रिस्टॅक या योजनेत नावनोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती.

राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक, पॅनकार्डप्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, बँकेचे खाते नंबर आणि शेतीची सर्व माहिती एकत्रित असावी, हा योजेनेचा उद्देश असून, राज्य सरकारच्या अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत ही प्रक्रिया राबवली जात आहे. शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहेत.

'फार्मर आयडी'ची उपयुक्ततासरकारी योजनांचा लाभ सहजरीत्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. मध्यस्थांची भूमिका कमी करणे. आयडी तयार झाल्यानंतर, शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच पीएम किसान योजनेची पडताळणी देखील सोपी होणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे.अशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर फार्मर आयडी नंबरचा मेसेज यायला सुरवात झाली आहे.

तुम्हाला हा मेसेज आला नसेल आणि तुमच्या फार्मर आयडीच्या अर्जाची स्थिती त्याचे स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर ते कसे पहायचे ते सविस्तर पाहूया.

कसे चेक कराल अर्जाचे स्टेटस?१) सुरवातीला https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/checkEnrolmentStatus ह्या लिंकवर क्लिक करा.२) त्यानंतर तुम्हाला Enrollment id आणि Aadhaar No हे दोन ऑप्शन दिसतील.३) वरील दोन ऑप्शनमधील Enrollment id किंवा Aadhaar No ह्यापैकी एक जे तुम्हाला माहित आहे त्यापुढील गोलावर क्लिक करा.४) त्यानंतर जो ऑप्शन क्लिक केला आहे त्याप्रमाणे खालील चौकोनात नंबर टाकावा.५) त्यानंतर चेक वर क्लिक करा.६) पुढे तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्थितीत आहे ते समजेल.७) ह्यात जर अर्ज अप्रुव्हल झाला नसेल तर Pending असे दिसेल तर अर्ज अप्रुव्हल झाला असेल तर ११ अंकाचा सेन्ट्रल आयडी दिसेल व त्यापुढे Approved असे स्टेटस दिसेल.

अधिक वाचा: आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच करता येणार रेशनसाठी ई-केवायसी; कशी? वाचा सविस्तर

टॅग्स :शेतकरीशेतीसरकारकेंद्र सरकारराज्य सरकारप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनासरकारी योजनाकृषी योजना