Join us

Fal Pik Vima 2024 : आंबा व काजू पिकांसाठी फळपिक विमा परतावा जाहीर.. हेक्टरी किती रुपये मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 15:44 IST

महसूल मंडळांतर्गत बसविण्यात आलेल्या तापमापक यंत्राचे ट्रिगर कार्यान्वित न झाल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसला आहे. यावर्षी ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा जाहीर झाला आहे.

रत्नागिरी : महसूल मंडळांतर्गत बसविण्यात आलेल्या तापमापक यंत्राचे ट्रिगर कार्यान्वित न झाल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसला आहे. यावर्षी ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा जाहीर झाला आहे.

हवामानाची अचूक नोंद न झाल्याने आंबा व काजू पिकासाठी जाहीर झालेला परतावा कमी आहे. परताव्याची ही रक्कम २५ ऑक्टोबरपर्यंत खात्यात जमा होणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. अवेळचा पाऊस, उच्चतम तापमान, नीच्चांकी तापमान यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास बागायतदारांना नुकसानभरपाई दिली जाते.

पीकविमा योजनेसाठी अद्याप दि. १५ मेपर्यंतचा कालावधी ग्राह्य धरला जातो. प्रत्यक्षात हंगाम दि. ३० मे रोजी संपतो. मात्र, जिल्ह्यात दि. १ डिसेंबर रोजी ठिकठिकाणी पाऊस पडला होता शासनाकडून ग्रामपंचायत स्तरावर तापमापक यंत्र बसविण्याची योजना गेली चार वर्ष बारगळली आहे.

त्याचा फटका बागायतदारांना बसला. जिल्ह्यातील ६५ महसूल मंडळांतर्गत तापमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. स्वयंचलित तापमापक यंत्रे असली तरी ट्रिगर कार्यान्वित होईल याची शाश्वती नसते.

प्रत्येक गावातील तापमान वेगवेगळे असते. त्याची नोंद घेणे आवश्यक आहे. जयगड (ता. रत्नागिरी) परिसरातील ट्रिगरच कार्यान्वित झालेले नाहीत. जिल्ह्यात अन्य भागातही हीच परिस्थिती आहे.

७ हजार आंब्यासाठीजिल्ह्यातील ३० हजार ४ आंबा बागायतदारांपैकी २६,९६९ शेतकरी पात्र ठरले आहेत. आंबा पिकासाठी ७० कोटी ४ लाख २३ हजार ७०८ रुपये परताव्याची रक्कम जाहीर झाली आहे. प्रत्यक्षात हेक्टरी सात हजार रुपयांप्रमाणेच बागायतदारांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.

१३ हजार काजूसाठीकाजू पिकासाठी प्रथमच भरघोस परतावा जाहीर झाला आहे. यासाठी ६,८१४ शेतकऱ्यांपैकी ५,४८० शेतकरी पात्र ठरले आहेत. हेक्टरी १३ हजाराप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. एकूण ८ कोटी ८० लाख ९५ हजार ८८२ रुपये परतावा जाहीर केली आहे.

टॅग्स :पीक विमारत्नागिरीफळेआंबाफलोत्पादनसरकारराज्य सरकारतापमानहवामानशेतकरीशेती