Join us

Fal Pik Vima 2024 : तुम्ही कर्जदार शेतकरी आहात आणि तुम्हाला फळ पिक विमा नकोय.. मग हे वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 12:23 IST

बँक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी, आठ दिवस आधी म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२४ पूर्वी पीक विमा काढावयाचा नसल्यास, बँकेला लेखी कळविणे बंधनकारक आहे.

रत्नागिरी : बँक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी, आठ दिवस आधी म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२४ पूर्वी पीक विमा काढावयाचा नसल्यास, बँकेला लेखी कळविणे बंधनकारक आहे, अन्यथा बँकेतर्फे त्या शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्याचा विमा काढला जाणार आहे, असे जिल्हा अग्रणी बँकेकडून कळविण्यात आले आहे.

ज्या शेतकऱ्यांना आपल्या फळ शेतीचा हवामानावर आधारित पीक विमा काढावयाचा आहे त्यांनी कर्ज घेतलेल्या बँकेशी संपर्क साधून आपल्या आंबा, काजू फळबागेचा पीक विमा काढावयाचा आहे किंवा नाही, याबाबत बँकेला फॉर्म भरून देणे अनिवार्य आहे.

जे शेतकरी कोणत्याही बँकेचे कर्जदार नाहीत, परंतु त्या शेतकऱ्यांना पीक विमा काढावयाचा आहे त्यांनी जवळील सीएससी (CSC) सेंटर किंवा शाखेशी संपर्क साधणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा: कोकणातील आंब्याचे अवेळी पाऊस व गारपीटीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी विमा योजना

पीक विमा उतरवण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी, आठ दिवस आधी म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२४ पूर्वी पीक विमा काढावयाचा नसल्यास, बँकेला लेखी कळविणे बंधनकारक आहे, अन्यथा बँकेतर्फे त्या शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्याचा विमा काढला जाणार आहे.

यावर्षीच्या हवामानावर आधारित पीक विमा ॲग्रीकल्चर विमा कंपनी, मुंबई यांच्यातर्फे काढला जाणार आहे. काजूसाठी संरक्षित रक्कम १,२०,००० पर्यंत तर आंब्यासाठी १,७०,००० पर्यंत आहे.

दोन्ही पिकांचा विमा घेण्याची बँक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२४ आहे. विमा संरक्षण प्रति शेतकरी जास्तीत जास्त ४ हेक्टरपर्यंत मिळेल.

कर्जदार शेतकऱ्यांसाठी विम्यासाठी आवश्यक कागदपत्रेकर्जदार असलेल्या बँकेला पिकविमा काढण्याचे पत्र तसेच स्वतःचा सातबारा नसल्यास नोंदणीकृत करार (रजिस्टर अग्रीमेंट) 

कर्जदार नसलेल्या शेतकऱ्यांसाठी कागदपत्रे मागणी अर्ज सातबारा व ८अ (झाडांची नोंद असलेला), आधार कार्ड झेरोक्स (स्वतःच्या सहीसह), DBT Enabled बँक पासबुक झेरॉक्स स्वतःच्या सहीसह, ड्राफ्ट डिक्लेरेशन, रजिस्टर अॅग्रीमेंट नोंदणीकृत करार (भाडेकरारावर बाग असल्यास), बागेचा जीओ टॅग फोटो अनिवार्य, सामाईक संमतीपत्र.

अधिक वाचा: Kaju Pik Vima : अवेळी पाऊस व गारपीटीने काजू पिकाचे नुकसान झाले तर कसा मिळेल विमा

टॅग्स :पीक विमाफळेआंबारत्नागिरीकोकणबँकपीक कर्जफलोत्पादन