Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > नामांकित कंपनीच्या नावाने बनावट कृषी औषधांची सुरू होती विक्री; पोलिस व कृषी विभागाच्या कारवाईत मुद्देमाल जप्त

नामांकित कंपनीच्या नावाने बनावट कृषी औषधांची सुरू होती विक्री; पोलिस व कृषी विभागाच्या कारवाईत मुद्देमाल जप्त

Fake agricultural medicines were being sold under the name of a well-known company; Police and Agriculture Department seized the goods in action | नामांकित कंपनीच्या नावाने बनावट कृषी औषधांची सुरू होती विक्री; पोलिस व कृषी विभागाच्या कारवाईत मुद्देमाल जप्त

नामांकित कंपनीच्या नावाने बनावट कृषी औषधांची सुरू होती विक्री; पोलिस व कृषी विभागाच्या कारवाईत मुद्देमाल जप्त

शेतकऱ्यांच्या पिकांवर थेट परिणाम करणाऱ्या बनावट कृषी औषधांच्या विक्रीचा गंभीर प्रकार लोणार येथे उघडकीस आला आहे. बनावट द्रावण विकले जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई केली आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांवर थेट परिणाम करणाऱ्या बनावट कृषी औषधांच्या विक्रीचा गंभीर प्रकार लोणार येथे उघडकीस आला आहे. बनावट द्रावण विकले जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई केली आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांवर थेट परिणाम करणाऱ्या बनावट कृषी औषधांच्या विक्रीचा गंभीर प्रकार बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार येथे उघडकीस आला आहे. एका नामांकित कंपनीच्या नावाने बनावट अमिनो आम्लयुक्त जैव-उत्तेजक द्रावण विकले जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत २९,००८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरिहंत ऍग्रो कृषी सेवा केंद्र, लोणार येथे बनावट औषधांची विक्री सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिस, शासकीय पंच व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानावर छापा टाकला. या कारवाईत दुकानातील रैंक, तसेच पाठीमागील गोडावूनमधून अमिनो आम्लयुक्त जैव-उत्तेजक द्रावणाच्या एक लिटरच्या १६ सिलबंद बॉटल्स आढळून आल्या. प्रत्येकी १,८१३ रुपये किमतीप्रमाणे हा साठा जप्त करण्यात आला.

जप्त बॉटल्सची तपासणी केली असता त्या मूळ उत्पादनाच्या नक्कल असल्याचे स्पष्ट झाले. मूळ आणि बनावट बॉटलमध्ये अनेक फरक आढळून आले. लोगोचा रंग फिकट हिरवा असणे, उत्पादन ओळख क्रमांकात तफावत, सिरीयल नंबरच्या फॉन्टमध्ये - बदल तसेच झाकणाच्या रंगात भिन्नता आढळली. या बनावट औषधांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची तसेच पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची गंभीर शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सतीश तानाजी पिसाळ (नाशिक) यांनी तक्रार दिली असून, त्यावरून सचिन सुभाषचंद्र बोरा (वय ४७, रा. जैन मंदिर परिसर, लोणार) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कारवाईमुळे लोणार परिसरातील बनावट कृषी औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

या प्रकरणाची सखोल व उच्चस्तरीय चौकशी झाल्यास बनावट कृषी औषधांच्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अशा गंभीर बाबींकडे स्थानिक पातळीवर सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी नियमित तपासणी व कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

पिकांच्या वाढीसाठी करतात वापर

इसॅबियन नामक हे द्रावण अर्थात अमिनो आम्लयुक्त जैव-उत्तेजक द्रावण हे पिकांच्या वाढीसाठी वापरल्या जाते. त्यामुळे पिकांची प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया वाढून पिकांची वाढ होते. कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांसाठी ते वापरता.

हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा

Web Title : नामचीन कंपनी के नाम से नकली कीटनाशक बेचे जा रहे थे; माल जब्त

Web Summary : लोणार में नकली कीटनाशक रैकेट का भंडाफोड़, पुलिस और कृषि विभाग ने 29,008 रुपये के नकली अमीनो एसिड-आधारित बायो-स्टिमुलेंट जब्त किए। पैकेजिंग और उत्पाद पहचान में विसंगतियां पाए जाने के बाद एक दुकानदार पर मामला दर्ज, किसानों के नुकसान और फसल क्षति की आशंका। बड़े नेटवर्क के लिए जांच जारी।

Web Title : Fake Pesticides Racket Busted; Goods Seized in Police Action

Web Summary : Police and agriculture department busted a fake pesticide racket in Lonar, seizing counterfeit amino acid-based bio-stimulant worth ₹29,008. A shopkeeper is booked after officials found discrepancies in packaging and product identification, raising concerns about farmers' losses and crop damage. Investigation underway for a larger network.