lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील सहकारी साखर कारखान्यातील कार्यकारी संचालकांना सेवानिवृत्तीनंतर वयात मुदतवाढ

राज्यातील सहकारी साखर कारखान्यातील कार्यकारी संचालकांना सेवानिवृत्तीनंतर वयात मुदतवाढ

Extension of age after retirement of executive directors of cooperative sugar factories in the state | राज्यातील सहकारी साखर कारखान्यातील कार्यकारी संचालकांना सेवानिवृत्तीनंतर वयात मुदतवाढ

राज्यातील सहकारी साखर कारखान्यातील कार्यकारी संचालकांना सेवानिवृत्तीनंतर वयात मुदतवाढ

साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदी असणाऱ्या व्यक्तीच्या सेवा त्यांच्या वयाच्या ६० वर्षानंतर संपुष्टात आल्यावर सदर व्यक्तीस वयाच्या ६२ वर्षापर्यत मुदतवाढ देण्याबाबतची तरतूद आहे. त्या तरतूदीमध्ये बदल करण्यात येऊन शासन मान्यतेने टप्याटप्याने वयाच्या ६५ वर्षापर्यत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदी असणाऱ्या व्यक्तीच्या सेवा त्यांच्या वयाच्या ६० वर्षानंतर संपुष्टात आल्यावर सदर व्यक्तीस वयाच्या ६२ वर्षापर्यत मुदतवाढ देण्याबाबतची तरतूद आहे. त्या तरतूदीमध्ये बदल करण्यात येऊन शासन मान्यतेने टप्याटप्याने वयाच्या ६५ वर्षापर्यत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदी असणाऱ्या व्यक्तीच्या सेवा त्यांच्या वयाच्या ६० वर्षानंतर संपुष्टात आल्यावर सदर व्यक्तीस वयाच्या ६२ वर्षापर्यत मुदतवाढ देण्याबाबतची तरतूद आहे. त्या तरतूदीमध्ये बदल करण्यात येऊन शासन मान्यतेने टप्याटप्याने वयाच्या ६५ वर्षापर्यत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे निकष पूर्ण होतील याची खात्री करूनच साखर आयुक्त यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा.

निकष:
१) संबंधीत कार्यकारी संचालकाविरुध्द आर्थिक गैरव्यवहार/अनियमितता चौकशी प्रस्तावीत नसावी.
२) मागील ५ वर्षामध्ये कारखान्याच्या संचित तोट्याचे प्रमाण ७५ टक्केपेक्षा कमी केले असावे.
३) कारखान्याची मागील वर्षाची आर्थिक पत्रके पूर्ण करुन लेखापरिक्षणासाठी उपलब्ध करुन विहित मुदतीत घेण्यात येणाऱ्या सर्वसाधारण सभेपुर्वी लेखापरीक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
४) कारखान्याच्या गाळप क्षमतेचा पूर्ण वापर करुन उपपदार्थावर आधारीत प्रकल्पाच्या क्षमतेचा ९० टक्के पेक्षा जास्त वापर करणे आवश्यक आहे.
५) शासन, साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने वेळोवेळी मागणी केलेली माहिती विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे.
६) केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करावी.
७) केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध कर्ज, भाग भांडवल व इतर वित्तिय सहाय्याची विहित मुदतीत परतफेड केली असली पाहिजे.
८) शास्त्रीयदृष्ट्या ऊस विकासाचा कार्यक्रम राबवून साखर उतारा वाढीसाठी प्रयत्न तसेच विविध स्तरावर होणारे तोटे (Losses) ९०% पर्यंत कमी करण्यासाठी प्रयत्न केले असले पाहीजेत.
९) मुदतवाढीच्या कालावधीत काम करणाऱ्या कार्यकारी संचालकांना त्यांचे वेतन व भत्ते यांच्यापेक्षा जास्त असणार नाही इतकेच एकत्रित वेतन देण्यात यावे. मुदतवाढीचा कालावधी हा पुनर्नियुक्ती म्हणून समजण्यात यावा.
१०) सेवानिवृत्त होवून कार्यरत नसलेल्या कार्यकारी संचालकांना पुनर्नियुक्ती देण्यात येवू नये.
११) राज्यातील सहकारी साखर कारखान्यातील कार्यकारी संचालकांना मुदतवाढ देताना संबंधित व्यक्ती त्या पदावर काम करण्यास शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याची खातरजमा करूनच प्रस्ताव सादर करण्यात यावा.
१२) साखर कारखान्याने मुदतवाढीबाबत ठराव करतांना वरील निकषांची पूर्तता करण्यात आली असल्याची खातरजमा साखर आयुक्त, पुणे यांनी करावी.

अधिक वाचा: ६७६ लाख टनाचे ऊस गाळप करून ६५ लाख टन साखरेचे उत्पादन घेत महाराष्ट्र देशात अव्वल

वरील प्रमाणे निकषांची पूर्तता करणाऱ्या कार्यकारी संचालकांना मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल. त्याबाबतचे सरसकट प्रस्ताव शासनास सादर न करता सबळ कारणमीमांसा आणि विशेष कारण नमूद करून स्वयंस्पष्ट शिफारस/अभिप्राय शासनास सादर करणे आवश्यक राहील. शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी साखर आयुक्त यांनी वरील निकषांनुसार तपासून स्वयंस्पष्ट शिफारशींसह प्रस्ताव किमान १ महिना अगोदर शासनास सादर करावा लागणार आहे.

Web Title: Extension of age after retirement of executive directors of cooperative sugar factories in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.