Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतरस्त्यावर अतिक्रमण किंवा शेतरस्ता आडवणे पडणार महागात; होणार आता 'ही' शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:07 IST

shet raste yojana राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतीमालाची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतीमालाची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे.

या हेतूने राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी दिनांक १४.१२.२०२५ रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.

शेत रस्त्यावर अतिक्रमण केले तर...◼️ गाव नकाशांवर दर्शविण्यात आलेले व शासकीय जागेत असलेल्या रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण ७ दिवसात काढण्याबाबत नोटीस द्यावी.◼️ सदर अतिक्रमण करणाऱ्याने जर अतिक्रमण काढले नाही तर सदर अतिक्रमण शासन स्तरावरून तहसीलदार यांच्यामार्फत काढण्यात येईल.◼️ ज्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १४३ अन्वये किंवा मामलेदार अधिनियम, १९०६ च्या कलम ५ अन्वये इतर शेतकऱ्यांचा ये-जा करण्याचा हक्क मान्य करण्यात आला आहे अशा रस्त्यांवर संबंधित शेतकऱ्यास पीक लागवड करता येणार नाही.◼️ तसेच सदर रस्त्यांचे नुकसान करणाऱ्यांचे आधार कार्ड व फार्मर आयडी ५ वर्षांकरीता ब्लॉक करण्यात येईल व शासनाच्या विविध योजनांचे लाभ व कोणतीही शासकीय मदत मिळण्यापासून अपात्र ठरेल.

शेतकऱ्याने शेतरस्त्यास जमीन देण्याबाबत महत्वाच्या बाबी◼️ प्रस्तुत योजना राबविण्याकरीता कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करण्यात येणार नाही.◼️ जे शेतकरी स्वतःहून त्यांची जमीन पाणंद रस्त्याकरीता देतील त्यांनी देण्यात येणाऱ्या जमिनीचे नोंदणीकृत दानपत्र/बक्षीसपत्र/हक्कसोड करणे अनिवार्य राहील.◼️ सदर नोंदणीकृत अभिलेखामध्ये लिहुन घेणार म्हणून शासनाच्या वतीने संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.◼️ तसेच नोंदणीकृत अभिलेखाची नोंद सदर शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर घेण्यात येईल.◼️ असे नोंदणीकृत दानपत्र/बक्षीसपत्र/हक्कसोड पत्र हे शासनाच्या लाभात करण्यात येत असल्याने ते नोंदणीकृत करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम ३ नुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ आहे.◼️ या प्रयोजनार्थ शेतकऱ्याने शासनास दिलेली जमीन परत मागण्याचा/मिळण्याचा सदर शेतकऱ्याला हक्क राहणार नाही.

अधिक वाचा: राज्यात जिल्हानिहाय रॉकेल वाटपाचा कोटा ठरला; कधीपासून आणि कशी होणार रॉकेल वाटप?

टॅग्स :शेतीशेतकरीसरकारशासन निर्णयराज्य सरकारमहसूल विभागग्राम पंचायतमुख्यमंत्रीतहसीलदार