Join us

राज्यात ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर साडेआठ हजार कृषी सहायक आजपासून संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:59 IST

कृषी विभागाच्या विविध योजना तसेच धोरणांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरावरील कृषी सहायकांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनाला एक आठवडा पूर्ण झाला आहे.

पुणे : कृषी विभागाच्या विविध योजना तसेच धोरणांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरावरील कृषी सहायकांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनाला एक आठवडा पूर्ण झाला आहे.

सरकारी पातळीवर त्याची दखल न घेतल्याने संघटनेने गुरुवारपासून (दि. १५) कामबंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यात सुमारे साडेआठ हजार कृषी सहायक सहभागी होणार आहेत. परिणामी, कृषी विभागाचे ग्रामस्तरावरील काम ठप्प होईल, असा दावा संघटनेचे अध्यक्ष विलास रिंढे यांनी केला आहे.

समान काम समान वेतन या धोरणानुसार कृषी सहायक म्हणून नियमित करावे, अशी मागणी आहे.

या आहेत प्रमुख मागण्या- कृषी सहायकांच्या पदनामात बदल करावा.- योजनांच्या अंमलबजावणीसाठी पायाभूत सुविधा पुरवाव्यात.- तसेच पदोन्नती मिळण्यासाठी आकृतिबंधात कृषी पर्यवेक्षकांच्या जागांमध्ये वाढ करावी.अशा मागण्यासाठी राज्यातील सर्व कृषी सहायकांनी असहकार आंदोलन पुकारले आहे, असे संघटनांच्या वतीने कळवण्यात आले आहे.

अधिक वाचा: बियाणे घरचे असो अथवा विकतचे, पेरणी अगोदर ही सोपी तपासणी कराच? वाचा सविस्तर

टॅग्स :खरीपसरकारराज्य सरकारसंपपुणेमहाराष्ट्रशेतकरीशेती