प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यासाठी अँड्रॉइड अॅप अपडेट करावे लागणार आहे. या नव्या अॅपच्या माध्यमातून शेतकरीवर्गाला ई- पीक पाहणी सहजरीत्या नोंद करता येणार आहे.
शेतातील बांधावरची झाडेदेखील या अॅपच्या माध्यमातून सातबारावर नोंदविता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला एक नवीन आयडी मिळणार आहे. शासनाने विविध योजना दिल्यास त्याची सर्व माहिती मिळणार आहे.
ई-पीक पाहणी कशासाठी?
खरीप, रब्बी हंगामात पेरणी केलेल्या पिकाचे क्षेत्र अचूक नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी महत्त्वाची आहे.
नव्या डीसीएस अॅपमध्ये काय आहे?
अॅपमध्ये सर्व नोंदी शेतावर जाऊन करायचे आहे. खरीप व रब्बी पिकांची नोंद या अॅप माध्यमातून वैयक्तिक स्वरुपात होणार आहे.
५० मिटरपेक्षा दूरचा फोटो नाही चालणार!
या अपमध्ये प्रत्यक्षात शेतात उभे राहून पीक पेरा नोंदवावा लागणार आहे. पूर्वी घरबसल्या कशाही व कोणत्याही पद्धतीचा पीक पेरा लावला जात असे. आता शेतात त्या गटात कोणते पीक आहे, त्याचीच नोंद होणार आहे.
बांधावरची झाडेही नोंदवता येणार
शेतात वृक्ष लागवड केली असेल तर, या अॅपमुळे त्या झाडाची त्या गट नंबरमध्ये नोंद करता येणार आहे.
...तर मिळणार नाही नुकसान भरपाई
ई-पीक पाहणी नोंदीशिवाय अतिवृष्टी व कोणत्याही कारणाने झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई मिळणार नाही. तसेच पुढे बँक कर्ज देणार नाहीत. त्यामुळे ई-पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीची ई-पीक पाहणी करून घ्यावी. अतिवृष्टी, शेतीसंदर्भात शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी या अॅपच्या माध्यमातून नोंदी कराव्यात. - श्याम कुलकर्णी, मंडळ अधिकारी.