संपूर्ण राज्यात उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता दिनांक ८ एप्रिल २०२६ पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅप द्वारे पीक नोंदणी करावयाची आहे.
दिनांक ८ एप्रिल २०२६ पासून राज्यातील सर्व गावांमध्ये उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ डिजीटल क्रॉप सर्वे पिक पाहणी सुरु करण्यात येत आहे.
या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरून मोबाईल अॅपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.
हंगाम - उन्हाळी
◼️ शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी कालावधी - ८ एप्रिल २०२६ ते २४ मे २०२६
◼️ सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी कालावधी - २५ मे २०२६ ते ८ जुलै २०२६
डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत १००% ई-पीक पाहणी नोंद करणे बंधनकारक आहे. उन्हाळी हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड अथवा चालू पड असलेल्या जमिनींची नोंद करणे आवश्यक आहे.
तरी शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी न केलेल्या सर्व शेतजमिनींची १००% ई-पीक पाहणी मोबाईल अॅप द्वारे सहायक स्तरावरून पूर्ण करण्यात येईल याची दक्षता घ्यावी.
तरी उपरोक्त प्रमाणे सूचना आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी व सहायक यांना देण्यात याव्यात हि विनंती.
असे पत्र निलप्रसाद चव्हाण (उप-जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक, ई-पीक पाहणी प्रकल्प, महसूल माहिती तंत्रज्ञान कक्ष, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे) यांनी काढले आहे.
अधिक वाचा: लाईट बिल अजून कमी होणार, आता मिळणार डिस्काउंट; कोणत्या युनिट स्लॅबला किती रुपये डिस्काउंट?
