Join us

Doordarshan दूरदर्शनचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश; आता बातम्या सांगणार दोन कृत्रिम निवेदक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 10:16 AM

९ वर्षांच्या अफाट यशानंतर, डीडी किसान DD Kisan वाहिनी २६ मे २०२४ रोजी भारतातील शेतकऱ्यांसाठी वाहिनीवरील सादरीकरण एका नवीन स्वरूपात आणि नवीन शैलीत घेऊन येत आहे.

९ वर्षांच्या अफाट यशानंतर, डीडी किसान वाहिनी २६ मे २०२४ रोजी भारतातील शेतकऱ्यांसाठी वाहिनीवरील सादरीकरण एका नवीन स्वरूपात आणि नवीन शैलीत घेऊन येत आहे. हे सादरीकरण दूरदर्शनच्या कामगिरीतील एक महत्वाचा टप्पा ठरणार असून हे सादरीकरण नव्या ढंगात होणार आहे.

यावेळी सर्वांच्या नजरा कृत्रिम बुद्धिमत्ता निवेदकांवर खिळून रहातील, कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात दूरदर्शन किसान ही देशातील पहिली सरकारी दूरदर्शन वाहिनी बनणार आहे, जी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे सादरीकरण करणार आहे.

डीडी किसान वाहिनी दोन एआय अँकर (एआय क्रिश आणि एआय भूमी) यांना घेऊन सादरीकरण करणार आहे. हे वृत्त निवेदक प्रत्यक्षात जे कॉम्प्युटर आहेत, ते हुबेहुब माणसासारखे आहेत किंवा जे माणसासारखे काम करू शकतात.

ते न थांबता किंवा न थकता २४ तास आणि ३६५ दिवस बातम्या वाचू शकतात. काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचलपर्यंत देशातील सर्व राज्यांमधील शेतकरी दर्शकांना हे निवेदक पाहता येणार आहेत.

हे एआय निवेदक देशात आणि जागतिक स्तरावर होत असलेली कृषी संशोधन विषयक माहिती, शेतकरी बाजारांचा कल, हवामानातील बदल किंवा सरकारी योजनांची माहिती अशी सर्व माहिती पुरवतील. या निवेदकांची एक खास गोष्ट म्हणजे ते देश-विदेशातील पन्नास भाषांमध्ये बोलू शकतील.

डीडी किसान वाहिनीची काही विशेष उद्दिष्टे डीडी किसान ही भारत सरकारने स्थापन केलेली आणि शेतकऱ्यांना समर्पित असलेली देशातील एकमेव दूरदर्शन वाहिनी आहे. या  वाहिनीची स्थापना २६ मे २०१५ रोजी झाली.- डीडी किसान वाहिनीच्या स्थापनेचा उद्देश शेतकऱ्यांना हवामानातील बदल, जागतिक आणि स्थानिक बाजारपेठा इत्यादींबद्दल नित्य माहिती देणे हा आहे, जेणेकरून शेतकरी अगोदरच आपल्या कामाचे योग्य नियोजन करू शकतील आणि वेळेवर योग्य निर्णय घेऊ शकतील.संतुलित शेती, पशुसंवर्धन आणि वृक्षारोपण यांचा समावेश असलेल्या शेतीच्या त्रिस्तरीय संकल्पनेला डीडी किसान वाहिनी बळकट करत आहे.

अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावर चुकीचे नाव लागले असेल तर नावात बदल करता येऊ शकतो का?

टॅग्स :टेलिव्हिजनआर्टिफिशिअल इंटेलिजन्सकेंद्र सरकारशेतकरीशेतीभारतबाजारहवामान