Join us
Daily Top 2Weekly Top 5

Betel Leaves : विसरू नका, दररोज खा विडा; कॅन्सर पासून ते सर्दी खोकला पर्यंत सर्व आजरांचा क्षणात घालवा तिढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 14:45 IST

Betel Leaves: नागवेलीच्या पानाचे अनेक पारंपरिक व औषधी महत्त्व आहे. ज्यात ते विविध आजरांवर प्रभावी देखील आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया नागवेलीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे.

अविनाश कदम

नागवेलीच्या पानाचे अनेक पारंपरिक व औषधी महत्त्व आहे. नागवेलीचे पान हे विविध संस्कृतींमध्ये आणि आयुर्वेदामध्ये औषधी गुणधर्मांसाठी वापरले जाते.

जेवण केल्यानंतर पान खाणे भारतीयांना खूप आवडते. तसेच हिरवे पान देखील अनेक पद्धतींनी खाल्ले जाते. हिरव्या नागवेलीच्या पानात अनेक औषधी गुण असतात. हेच पान आरोग्यासाठी खूप फायद्याचे मानले जाते. 

आजी-आजोबाचा पानपुडा!

पूर्वीच्या काळी आजी-आजोबा त्यांच्याकडे पानपुडा व बटव्यामध्ये विड्याचे पान, सुपारी, कात, चुना, लवंग, ओवा, सोप, इलायची, जायफळ ठेवायचे तर त्यांचे जेवण झाल्यानंतर पानांचा विडा खात होते. पचन होणे अन् शरीराला कॅल्शियम मिळणे हे त्याचे शास्त्रीय कारण आहे. तसेच इत्यादी घटकांमुळे शरीर तंदुरुस्त राहत होते.

नागवेलीच्या पानाचे फायदे

सर्दी-खोकला दूर होतो - सर्दी झाल्यास पान लवंगसोबत खाणे फायद्याचे आहे. खोकला दूर करण्यासाठी ओवा सोबत पान चावून खाल्ले पाहिजे.

पचनक्रिया सुधारते - हिरवे पान चावून खाल्ल्यास त्यापासून बनलेल्या लाळेने पचनक्रिया सुधारते. भारताच्या अनेक राज्यांत जेवणानंतर पान खाण्याची परंपरा आहे.

तोंडाच्या कॅन्सरपासून बचाव - पानात असलेले अॅस्कॉर्बिक अॅसिड या अँटिऑक्सिडंट घटकामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात. यामुळे तोंडाच्या कॅन्सरपासूनही बचाव होतो.

किडनीसाठीही फायद्याचे - किडनी खराब झाली असेल तर पानाचे सेवन फायद्याचे ठरते. तथापि, यासोबत तिखट मसाले, दारू, मांसाहार करू नये

ज्यांना पचनाच्या तक्रारीपासून दूर राहायचे आहे त्यांनी जेवणानंतर नागवेलीचे पान खावे, तसेच तोंडाचा वास येत असेल त्यांनी पिकलेले विड्याचे पान किंचित जायफळ, इलायची दाताखाली चावत राहावे. नंतर तोंडाचा वास बंद होतो. तर सर्दी व खोकला, भूक लागत नसेल तर विड्याच्या पानांचा रस घेतल्याने फरक - डॉ. अनिल गुंड, आयुर्वेदतज्ज्ञ बीड.

हेही वाचा - जांभूळ खाऊन बिया फेकत असाल तर थांबा ? जांभूळ बिया आहेत आरोग्यास जांभळापेक्षा अधिक फायद्याच्या

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यशेती क्षेत्रकर्करोगअन्नआहार योजना