नवी दिल्ली: तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा जास्त असल्यास, तुमची घरगुती गॅसची (एलपीजी) सबसिडी कायमची बंद होऊ शकते.
सरकारने गॅस सबसिडी नियमांची अंमलबजावणी सुरू केली असून, थेट आयकर विभागाच्या डेटावरून अशा ग्राहकांची ओळख पटवली जात आहे.
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी अशा ग्राहकांना मोबाइलवर मेसेज पाठवले आहेत.
ज्यांचे करपात्र उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, या ग्राहकांनी सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्यासही सांगितले आहे.
दरम्यान, गॅस चोरी रोखण्यासाठी आता 'डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड' (डीएसी) अनिवार्य करण्यात आला आहे.
अधिक वाचा: १०० गोणी कांद्याला मिळाले १४०० रुपये; हतबल झालेल्या शेतकऱ्याने २ एकरातील कांदा दिला पेटवून
