lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > उन्हाळ्यात उष्णतेमुळे लागणाऱ्या आगीपासून जनावरांच्या चाऱ्याचे 'असे' करा संरक्षण

उन्हाळ्यात उष्णतेमुळे लागणाऱ्या आगीपासून जनावरांच्या चाऱ्याचे 'असे' करा संरक्षण

Do-it-yourself protection of animal fodder against fires caused by summer heat | उन्हाळ्यात उष्णतेमुळे लागणाऱ्या आगीपासून जनावरांच्या चाऱ्याचे 'असे' करा संरक्षण

उन्हाळ्यात उष्णतेमुळे लागणाऱ्या आगीपासून जनावरांच्या चाऱ्याचे 'असे' करा संरक्षण

शेतकऱ्यांना चारा साठवणूक करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत. 

शेतकऱ्यांना चारा साठवणूक करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सद्यस्थितीत दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्याने, उपलब्ध चाऱ्याची योग्य प्रकारे निगा राखणे आवश्यक आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भात सल्ला दिला असून उन्हाळ्यात चारा साठवणुकीसाठी काय करावे याचे मार्गदर्शन केले आहे. शेतकऱ्यांना चारा साठवणूक करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत. 

काय करू नये?

  • वाळलेला चारा/कडब्याच्या गंजीजवळ कोणत्याही ज्वलनशील पदार्थांचा साठा करण्यात येवू नये
  • वाळलेला चारा/कडब्याच्या गंजी अथवा उपलब्ध चाऱ्याच्या साठ्याजवळ चूल, गॅस, कंदिल, अथवा स्टो, शेगडी इत्यादी पेटवू नये.
  • वाळलेला चारा/कडब्याच्या गंजी व मुरघासच्या साठ्याजवळ उघड्या इलेक्ट्रिकच्या तारा (वायर) ठेवू नये.
  • गंजी अथवा चाऱ्याच्या साठ्याजवळ इलेक्ट्रिक वायर असल्यास, एकतर त्या गंजीपासून दूर स्थलांतरीत कराव्यात आणि उघड्या असल्यास इन्सुलिन टेपने व्यवस्थित बंदिस्त कराव्यात, जेणेकरून शॉर्ट सर्किट होवून आग लागणार नाही.
  • इलेक्ट्रिक वायरच्या खाली अथवा जवळ वाळलेला चारा/कडब्याच्या गंजी रचू नये व साठा करू नये.
  • वाळलेला चारा/कडब्याच्या गंजीजवळ कोणासही बीडी, सिगारेट यासारख्या वस्तू पेटवू देवू नयेत.


काय करावे?

  • वाळलेला चारा/कडब्याच्या गंजी अथवा चाऱ्याच्या साठ्याजवळ कायमस्वरूपी वाळूने भरलेल्या बादल्या ठेवाव्यात.
  • अवकाळी पावसामध्येही मुरघास व चारा भिजणार नाही याची पशुपालकांना काळजी घेण्यास सांगावे. कारण मुरघास अथवा चारा पावसात भिजल्यास, त्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असतो.
  • शेतातील उभा हिरवा चारा अवकाळी पावसाने खाली पडल्यास, सदरचा चारा उन्हामध्ये व्यवस्थित सुकू द्यावा आणि तद्नंतरच व्यवस्थित सुकलेला/ वाळलेला चाऱ्याचा एकत्रित साठा करावा.
  • ओला चारा एकत्रित साठवून ठेवू नये. कारण ओल्या चाऱ्यामध्येही बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असतो व त्यामुळे पशुधनास रोग प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता असते.

Web Title: Do-it-yourself protection of animal fodder against fires caused by summer heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.