Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; आता सर्वसामान्य भाविकांना मिळणार समानतेने दर्शन

कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; आता सर्वसामान्य भाविकांना मिळणार समानतेने दर्शन

District Collector's orders in the backdrop of Kartiki; Now common devotees will get equal darshan | कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; आता सर्वसामान्य भाविकांना मिळणार समानतेने दर्शन

कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; आता सर्वसामान्य भाविकांना मिळणार समानतेने दर्शन

दर्शनसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये. रांगेचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे, असे आदेश कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

दर्शनसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये. रांगेचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे, असे आदेश कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

पंढरपूर : सर्व महत्त्वाच्या देवस्थानांमध्ये सर्वसामान्य भाविकांना समानतेने व शांततेने दर्शन दिले जावे. रांगेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये.

कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये. रांगेचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे, असे आदेश कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

कार्तिक शुद्ध एकादशीलापंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. कार्तिकी शुद्ध एकादशी २ नोव्हेंबर रोजी आहे. यात्रा कालावधी २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर असा आहे.

यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांचे जलद व सुलभदर्शन होण्याच्या दृष्टीने शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत व काटेकोर पालन करावे. दर्शन रांगेचे सुयोग्य नियोजन करून सर्वसामान्य भाविकांना शांततेने दर्शन देण्याची व्यवस्था करावी.

राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये उत्सवावेळी व इतर महत्त्वाच्या दिवशी काही भक्तांना नियमित प्रवेशद्वारातून न सोडता इतर प्रवेशद्वारातून दर्शनासाठी प्रवेश दिला जात असल्याने गर्दीच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत प्रसारमाध्यमांद्वारे व प्रत्यक्ष प्राप्त होतात.

अनेक देवस्थानांमध्ये उत्सवांच्या दिवशी अथवा इतर महत्त्वाच्या दिवशी व्हीआयपी दर्शन तसेच काही ठिकाणी शुल्क, देणगी आदी आकारून दर्शन दिले जाते. तसे प्रकार घडू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

पदांचा दुरूपयोग करून भक्तांना त्रास देऊ नये
कोणत्याही देवस्थानांमध्ये उत्सवाच्या व इतर महत्त्वाच्या दिवशी सर्व भाविकांना समानतेने एकाच रांगेतून प्रवेश देण्यात यावा. विश्वस्त, अधिकारी व पोलिसांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून भक्तांना सामान्य रांगेव्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने प्रवेश देऊ नये, असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.

दर्शनाकरिता पासेस वितरित करू नयेत
देवस्थान समितीने संबंधित देवस्थानातील महत्त्वाचा उत्सवाचा दिवस व गर्दीचा दिवस कोणता आहे, याबाबत दर्शनी भागावर स्पष्टपणे दिसेल, अशाप्रकारे ठळक अक्षरात फलक लावणे बंधनकारक राहील. देवस्थान समितीने महत्त्वाच्या सणाच्या दिवशी व इतर केव्हाही दर्शनासाठी पासेस वा प्रवेश पत्रिका वितरित करू नयेत.

अधिक वाचा: आंतरराष्ट्रीय बाजारात गाईच्या शेणाला प्रचंड मागणी; भारतातून कोणत्या देशात किती शेण होतंय निर्यात?

Web Title: District Collector's orders in the backdrop of Kartiki; Now common devotees will get equal darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.