Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > DAP Fertilizer Subsidy : शेतकऱ्यांना आजपासून डीएपी खतावर मिळणार विशेष अनुदान; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी 

DAP Fertilizer Subsidy : शेतकऱ्यांना आजपासून डीएपी खतावर मिळणार विशेष अनुदान; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी 

DAP Fertilizer Subsidy: Farmers will get special subsidy on DAP fertilizer from today; Union Cabinet approval | DAP Fertilizer Subsidy : शेतकऱ्यांना आजपासून डीएपी खतावर मिळणार विशेष अनुदान; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी 

DAP Fertilizer Subsidy : शेतकऱ्यांना आजपासून डीएपी खतावर मिळणार विशेष अनुदान; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी 

शेतकऱ्यांना डाय-अमोनियम फॉस्‍फेट (डीएपी) खत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जानेवारी २०२५ पासून एक विशेष अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना डीएपी खत परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहे.

शेतकऱ्यांना डाय-अमोनियम फॉस्‍फेट (डीएपी) खत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जानेवारी २०२५ पासून एक विशेष अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना डीएपी खत परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहे.

शेतकऱ्यांना डाय-अमोनियम फॉस्‍फेट (डीएपी) खत परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जानेवारी २०२५ पासून 'एनबीएस' अनुदानाव्यतिरिक्त एक विशेष अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना डीएपी खत परवडणाऱ्या किंमतीत मिळणार आहे.

या विशेष पॅकेजअंतर्गत आज बुधवार (दि.०१) पासून पुढील आदेश येईपर्यंत डीएपी खतावर ३,५०० रुपये प्रति मेट्रिक टन दरावर अनुदान दिले जाणार आहे. ज्यात सरकारचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना योग्य दरात खत उपलब्ध करुन देणे आणि कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवणे हे आहे.

सदरील मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. तसेच या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खताच्या किंमतीत होणाऱ्या वाढीच्या संकटातून काही अंशी दिलासा मिळणार आहे.

याआधी सरकारने जुलै २०२४ मध्ये एबीएस अनुदानाव्यतिरिक्त ०१.०४.२०२४ ते ३१.१२.२०२४ या कालावधीत एक विशेष पॅकेज मंजूर केले होते. ज्यामुळे २,६२५ कोटी रुपयांचा खर्च शेतकऱ्यांसाठी केला गेला होता. 

हेही वाचा : Profitable Farming Formula : एकात्मिक शेती पद्धतीद्वारे उत्पादनात होईल वाढ; आर्थिकतेची भरभराट

Web Title: DAP Fertilizer Subsidy: Farmers will get special subsidy on DAP fertilizer from today; Union Cabinet approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.