Join us

राज्यात खरीप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात; सर्वाधिक नुकसान कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 08:59 IST

kharif crop damage राज्यात अनेक ठिकाणी गेल्या महिनाभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः माती झाली.

पुणे: राज्यात अनेक ठिकाणी गेल्या महिनाभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः माती झाली.

बीड, जालना, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, यवतमाळ या जिल्ह्यांना एकट्या सप्टेंबर महिन्यात मोठा तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे क्षेत्र वाढत आहे.

सप्टेंबर महिन्यात तब्बल २६ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. त्यात बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत प्रत्येकी पावणेसहा लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे. त्या खालोखाल जालना आणि सोलापूर जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

हे अंदाजित नुकसान २७ सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे झाले असल्याचे कृषी विभागाने सांगितले. परिणामी, आता संपूर्ण खरिपात नुकसान झालेले क्षेत्र तब्बल ५२ लाख हेक्टरवर पोहोचले आहे.

अतिवृष्टी, महापूर आणि नुकसान या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आज होत आहे.  असून खरडून गेलेली शेती, दयनीय अवस्था झालेले शेतकरी, सर्वस्व गमावलेले लोक यांना कोणता दिलासा देणार याकडे डोळे लागले आहेत.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निकष बाजूला ठेवून वाळीव मदत देण्याची भूमिका जाहीर केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

यंदाचे शेतीचे नुकसान (हेक्टरमध्ये)जून - १.३४ लाखजुलै - १.४४ लाखऑगस्ट - २४.४४ लाखसप्टेंबर - २६ लाख

एकट्या सप्टेंबरमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान?जिल्हा क्षेत्र (हेक्टर)जळगाव - ११,४६४बुलढाणा - ६४,६८२अमरावती - २,६७३नागपूर - १,०१६नाशिक - १४,०३५ठाणे - ५छ. संभाजीनगर - १,६६,२२६वर्धा - २२,९६०अहिल्यानगर - ५,७८,७९८बीड - ५,७१,१००यवतमाळ - १,३७,५६८चंद्रपूर - ३,६३०रायगड - २४सातारा - ३२०सोलापूर - ३,५१,४३७हिंगोली - ९,५००वाशिम - ३८,५४१पुणे - २७३जालना - ३,७५,९७३रत्नागिरी - ६२सांगली - ३,५३५लातूर - ८,८०५परभणी - ५६,८३६धाराशिव - १,८१,२००एकूण - २६,००,६५८

अधिक वाचा: दुधाच्या ४ पट कॅल्शियम असणारी अन् ३०० विकारांवर मात करणारी 'ही' भाजी खाल्लीय का?

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's Kharif crops on 52 lakh hectares submerged; worst affected areas?

Web Summary : Heavy rains in Maharashtra damaged crops on 52 lakh hectares. Beed, Ahmednagar, Jalna, and Solapur are the worst-hit districts. The state cabinet is meeting to discuss relief measures for affected farmers.
टॅग्स :खरीपपीकपाऊसपूरसोलापूरहवामान अंदाजबीडअहिल्यानगरजालनाधाराशिव