Lokmat Agro >शेतशिवार > Crop Inurance Scam : पीएम पीक विमा योजनेतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर होणार कारवाई

Crop Inurance Scam : पीएम पीक विमा योजनेतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर होणार कारवाई

Crop Insurance Scam: High-level inquiry into PM Crop Insurance Scheme scam; Action will be taken against the culprits | Crop Inurance Scam : पीएम पीक विमा योजनेतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर होणार कारवाई

Crop Inurance Scam : पीएम पीक विमा योजनेतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर होणार कारवाई

Crop Inurance Scam: राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम पीक विमा ही कल्याणकारी योजना शासनाने राबविली. परंतू या योजनेत मोठे घोटाळे झाल्याचे निदर्शानास आले आहे. वाचा सविस्तर

Crop Inurance Scam: राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम पीक विमा ही कल्याणकारी योजना शासनाने राबविली. परंतू या योजनेत मोठे घोटाळे झाल्याचे निदर्शानास आले आहे. वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम पीकcrop विमाinsurance ही कल्याणकारी योजना शासनाने राबविली. परंतू या योजनेत मोठे घोटाळेScamp झाल्याचा आरोप विधानसभेत झाल्यानंतर या प्रकरणी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीकडून सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी(२२ डिसेंबर) रोजी विधानसभेत केली.

या घोटाळ्यांमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याचे प्रकरण विधानसभेत उचलले.

या घोटाळ्याचा पर्दाफाश करताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली आणि विमा कंपन्यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले असे ते म्हणाले.

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना धस यांनी उचललेल्या घोटाळ्यावर फडणवीस यांनी सांगितले की, आधी बीडमध्ये ही योजना इतकी चांगली चालविली गेली की त्यातून बीड पॅटर्न तयार झाला; मात्र धस यांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे.

केवळ बीडच नाही तर राज्याच्या इतर भागातही असे घोटाळे झाले आहेत का, याची माहिती घेऊन चौकशी केली जाईल. आणि दोषींवर कडक कारवाई होईल असेही त्यांनी सांगितले.

सुरेश धस यांनी दिली धक्कादायक माहिती

* भाजप आमदार सुरेश धस म्हणाले की, एक रुपयात पीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. भलतेच लोक मलई खात आहेत. हे राज्यभरात घडत आहे. याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असे म्हणत त्यांनी ते सादरही केले.
 
* या घोटाळ्यात एक रॅकेट सक्रिय आहे, पीक विमा माफिया फोफावले आहेत. २०२३-२४ या काळातील कृषी मंत्र्यांचीही पीक विम्यासंदर्भातील भूमिका संशयास्पद होती, असा आरोपही त्यांनी केला.

हे ही वाचा सविस्तर : Bogus Crop Insurance : परळीच्या 'या' शेतकऱ्यांचा तीन जिल्ह्यांत बोगस विमा काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Web Title: Crop Insurance Scam: High-level inquiry into PM Crop Insurance Scheme scam; Action will be taken against the culprits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.