Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Crop Insurance : शेतकऱ्यांनो! पीक विमा भरण्यासाठी आजची शेवटची तारीख; एक रूपयांत पीक विम्यासाठी अर्ज करा

Crop Insurance : शेतकऱ्यांनो! पीक विमा भरण्यासाठी आजची शेवटची तारीख; एक रूपयांत पीक विम्यासाठी अर्ज करा

Crop Insurance : Farmers! Today is the last date for payment of crop insurance; Apply for crop insurance at Rs | Crop Insurance : शेतकऱ्यांनो! पीक विमा भरण्यासाठी आजची शेवटची तारीख; एक रूपयांत पीक विम्यासाठी अर्ज करा

Crop Insurance : शेतकऱ्यांनो! पीक विमा भरण्यासाठी आजची शेवटची तारीख; एक रूपयांत पीक विम्यासाठी अर्ज करा

Crop Insurance Latest Updates : सध्या राज्यातील १ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घेतला असून राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

Crop Insurance Latest Updates : सध्या राज्यातील १ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घेतला असून राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

Maharashtra Crop Insurance Latest Updates : राज्यातील खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे. सरकारने एक रूपयांत पीक विमा योजना लागू केली असून त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. 

दरम्यान, कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीच्या आधारे आत्तापर्यंत म्हणजे आज सकाळीपर्यंत राज्यातील १ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे. तर पीक विमा भरण्यासाठी आजच शेवटची तारीख आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सीएससी केंद्रातून अर्ज करावेत. 

यंदाच्या खरीप हंगामासाठी १ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे. तर  ८९.८८ लाख हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र आहे. मागच्या हंगामात १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. तर त्यामध्ये १ कोटी १३ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते. तर यंदा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची आणि संरक्षित क्षेत्राची टक्केवारी कमी असल्याचं चित्र आहे.

आज पीक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख असली तरी कृषी विभागाने मुदतवाढीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला असून त्यावर आज सायंकाळपर्यंत निर्णय येऊ शकतो. शक्य झाल्यास ३१ जुलै पर्यंत विमा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते असे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी सांगितले.  
(Crop Insurance Apllication Last Date)

Web Title: Crop Insurance : Farmers! Today is the last date for payment of crop insurance; Apply for crop insurance at Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.