Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > BVGचे हणमंतराव गायकवाड यांची MGM केव्हीकेला सदिच्छा भेट!

BVGचे हणमंतराव गायकवाड यांची MGM केव्हीकेला सदिच्छा भेट!

BVG Hanmantrao Gaikwad goodwill visit to MGM KVK chhatrapati sambhajinagar | BVGचे हणमंतराव गायकवाड यांची MGM केव्हीकेला सदिच्छा भेट!

BVGचे हणमंतराव गायकवाड यांची MGM केव्हीकेला सदिच्छा भेट!

BVGचे हणमंतराव गायकवाड यांची MGM केव्हीकेला सदिच्छा भेट!

BVGचे हणमंतराव गायकवाड यांची MGM केव्हीकेला सदिच्छा भेट!

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशनच्या 41व्या वर्धापनदिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून BVG ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांचे शहरात आगमन झाले होते. त्या निमित्ताने दिनांक 20/12/2023 रोजी गांधेली येथील एमजीएम च्या आग्रिकल्चर कॅम्पस ला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचे सोबत एमजीएम गांधेलीचे सीईओ तथा असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सूर्यवंशी व संचालक डॉ. धापके हजर होते.

त्याठिकाणी त्यांनी नर्सरी, रेशीम धागा निर्मिती युनिट, दुग्ध प्रक्रिया, अन्न प्रक्रिया प्रकल्पास भेटी दिल्या. तसेच केव्हीके प्रक्षेत्रावरील मधुमक्षिका पालन व विविध पीक प्रात्याक्षिकांची पाहणी केली. या भेटी दरम्यान केव्हीके कडून होणाऱ्या कृषि विस्तार कार्याबद्दल ची माहिती केव्हीके चे प्रमुख काकासाहेब सुकासे यांनी दिली.

स्वागताला उत्तर देताना गायकवाड म्हणाले की, 'एमजीएम'ने  माळरानात स्वर्ग उभा केला असून शेतकऱ्यासाठी अतिशय उत्कृष्ट असे दालन उघडले आहे. बिव्हिजी ग्रुप सुद्धा शेतकरी हितासाठी काम करत असून यापुढे सुद्धा शेतकरी हितासाठी एमजीएम सोबत काम करण्याची इच्छा आहे. असं मत गायकवाड यांनी व्यक्त केले.

Web Title: BVG Hanmantrao Gaikwad goodwill visit to MGM KVK chhatrapati sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.