Lokmat Agro >शेतशिवार > Bibtya dahshat : महाराष्ट्रात 'इतक्या' हजार बिबट्यांचा मुक्तसंचार वाचा सविस्तर

Bibtya dahshat : महाराष्ट्रात 'इतक्या' हजार बिबट्यांचा मुक्तसंचार वाचा सविस्तर

Bibtya dahshat: Read the free circulation of 'so many' thousand leopards in Maharashtra in detail | Bibtya dahshat : महाराष्ट्रात 'इतक्या' हजार बिबट्यांचा मुक्तसंचार वाचा सविस्तर

Bibtya dahshat : महाराष्ट्रात 'इतक्या' हजार बिबट्यांचा मुक्तसंचार वाचा सविस्तर

Bibtya dahshat : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतशिवारालगतच्या वसाहतींमध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे. सध्या राज्यात बिबट्यांची किती संख्या आहे त्याविषयी वाचा सविस्तर

Bibtya dahshat : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतशिवारालगतच्या वसाहतींमध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे. सध्या राज्यात बिबट्यांची किती संख्या आहे त्याविषयी वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

गणेश वासनिक

अमरावती : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतशिवारालगतच्या  (Farmland) वसाहतींमध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सद्यस्थितीत ४ हजार ८०० च्या जवळपास बिबटे असल्याची नोंद वन्यजीव विभागाकडे आहे.  सध्या वाढत असल्याने बिबट्यांचे (Bibtya) नियंत्रण हाताबाहेर जात असल्याचे वास्तव आहे.

बचाव दलाची गरज

* सध्या महाराष्ट्रात बिबट-मानव संघर्ष कमालीचा उभा झाला आहे. वन्यप्राणी बचाव दलाची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

* वनविभगाला बिबट्यापासून शेतकऱ्यांचा बचाव करण्यासाठी १५ बचाव दलाची वनविभागाला गरज आहे.

दोन वर्षांत ५०० ने भर

* बिबट्याची 'सरप्राइज व्हिजीट' त्याच्या जिवावर उठली आहे. हल्ली 'पॉश' वस्तीपासून तर उसाच्या मळ्यापर्यंत बिबटे सहजतेने आढळून येत आहेत.

* बिबट्यांच्या संख्येत दोन वर्षात जवळपास ५०० ने भर पडली आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्याचा (leopards) वावर आढळत आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असल्याने बिबट्यांची संख्या अधिक आहे.

खरे तर बिबट्यांच्या संख्येत वाढ होणे निसर्ग साखळीसाठी चांगली बाब आहे. विशेषतः उस शेतीमध्ये बिबट्याचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होते. अहिल्यादेवीनगर, नाशिक या भागातील मानवी वस्तीत संचार ही नित्याचीच बाब झाली आहे. बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे ते जंगलाबाहेर येत असावे. - आदर्श रेड्डी, वनसंरक्षक, मेळघाट

हे ही वाचा सविस्तर :  Bibtya Attack : बिबट्यासोबत जगायचे की मरायचे? कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

Web Title: Bibtya dahshat: Read the free circulation of 'so many' thousand leopards in Maharashtra in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.