भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामातील १ ते १५ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाची बिले जमा केली आहेत.
प्रतिटन ३ हजार ६५३ रुपयांप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.
भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामासाठी प्रतिटन ३ हजार ६५३ रुपये एवढा उच्चांकी दर जाहीर केला आहे.
डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ६६ हजार ५७८ मॅट्रिक टन उसाच्या बिलापोटी २४ कोटी ३२ लाख १० हजार ३१७ रुपये उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत.
यंदाच्या हंगामात कारखान्याने दिनांक २९ जानेवारी अखेर ८० दिवसात ३ लाख ४८ हजार ८४० मेट्रिक टन ऊस गाळप करून ४ लाख २१ हजार ६३० क्विंटल साखर उत्पादित केली असून, सरासरी साखर १२.११ टक्के एवढा आहे.
कारखान्याने यावर्षी जाहीर केलेला दर हा राज्यात उच्चांकी असून यावर्षीच्या हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला पुरवठा करून सहकार्य करावे.
असे आवाहन कारखान्याचे चेअरमन पाटील व व्हाईस चेअरमन कवडे यांनी केले. यावेळी सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक सागर पाटील, जनरल मॅनेजर संजय पाटील व अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा: उसाचे पाचट जाळण्यापेक्षा 'या' दोन पद्धतीचा अवलंब करा; एकरी उत्पादनात होईल मोठी वाढ
Web Summary : Bhogavati Sugar Factory cleared sugarcane payments up to December 15th, offering a record ₹3,653 per ton. ₹24.32 crore was deposited into farmers' accounts for 66,578 metric tons of sugarcane. The factory aims for 6 lakh tons of crushing this season, urging farmers to supply cane.
Web Summary : भोगावती चीनी मिल ने 15 दिसंबर तक गन्ना भुगतान साफ़ कर दिया, ₹3,653 प्रति टन की रिकॉर्ड दर की पेशकश की। 66,578 मीट्रिक टन गन्ने के लिए ₹24.32 करोड़ किसानों के खातों में जमा किए गए। मिल का लक्ष्य इस सीजन में 6 लाख टन पेराई का है, किसानों से गन्ना आपूर्ति करने का आग्रह किया।