Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Bhimashankar strawberry : भिमाशंकरची स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच पोहचली दुबईला! मिळाला विक्रमी दर

Bhimashankar strawberry : भिमाशंकरची स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच पोहचली दुबईला! मिळाला विक्रमी दर

Bhimashankar Strawberry Bhimashankar strawberries reached Dubai! Record price received | Bhimashankar strawberry : भिमाशंकरची स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच पोहचली दुबईला! मिळाला विक्रमी दर

Bhimashankar strawberry : भिमाशंकरची स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच पोहचली दुबईला! मिळाला विक्रमी दर

आदिवासी शेतकऱ्यांनी तयार केलं स्ट्रॉबेरीचं क्लस्टर; मिळतेय जगात ओळख

आदिवासी शेतकऱ्यांनी तयार केलं स्ट्रॉबेरीचं क्लस्टर; मिळतेय जगात ओळख

Pune Bhimashankar  Strawberry : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात नव्यानेच स्ट्रॉबेरीचे क्लस्टर तयार होत असून यंदा ही स्ट्रॉबेरी परदेशात निर्यात करण्यात आली आहे. दोन टप्प्यात दुबईला ही स्ट्रॉबेरी निर्यात केली असून तेथील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला महाबळेश्वर आठवतं. पण मागच्या दोन ते तीन वर्षांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आदिवासी शेतकरी प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. आदिवासी विभागाच्या न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदान मिळत असून यातून आत्तापर्यंत ५५ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे यावर्षी स्ट्रॉबेरीचे क्षेत्र ३० गुंठ्यांवरून ३०० गुंठे म्हणजे ३ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. येथील शेतकऱ्यांना या स्ट्रॉबेरीचे 'भिमाशंकर स्ट्रॉबेरी' असं नामकरण केलं आहे.

येथील शेतकरी रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात करत असल्याने ही स्ट्रॉबेरी खाण्यासाठी अत्यंत गोड आणि मधाळ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांच्या प्रतिक्रियेसाठी दोन टप्प्यामध्ये दुबईला स्ट्रॉबेरी निर्यात करण्यात आली. निर्यातदार जयसिंग थोरवे यांनी पहिल्या टप्प्यात १८ किलो स्ट्रॉबेरी दुबईच्या बाजारात पाठवली आहे. 

निर्यात करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीला विक्रमी दर मिळाला आहे. अर्ध्या किलोच्या एका पॅकिंगसाठी ६०० रूपयांचा दर मिळाल्याचं निर्यातदारांनी सांगितलं आहे. स्ट्रॉबेरीचे क्लस्टर तयार होत असताना पहिल्यांदाच आदिवासी शेतकऱ्यांची स्ट्रॉबेरी दुबईला पोहचल्यामुळे येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असून येणाऱ्या काळात स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.   

महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीचे क्लस्टर तयार होण्यासाठी सुरूवातीला आयसीआयसीआय फाऊंडेशनने शेतकऱ्यांना रोपे देऊन लागवडीसाठी प्रोत्साहन दिले होते. त्यानंतर न्युक्लिअस बजेट अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास ९० टक्क्यापर्यंत अनुदान जाहीर करण्यात आले. या योजनेंतर्गत एकूण २५८ शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदान देण्याचे उद्दिष्ट्ये आहे.

या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाकडून केली जात असून कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक हे वेळोवेळी शेतकऱ्यांना भेटून मार्गदर्शन करत आहेत. त्यासोबतच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांचेही या कामासाठी नेहमीच पाठिंबा असतो. कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे हळूहळू शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाकडे वळत आहेत. 

आंबेगाव तालुक्यात स्ट्रॉबेरी पीक घेण्याचा हा आपला पहिलाच प्रयोग होता. सध्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन कमी आहे, पण आता लागवडीकडे शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत असून येणाऱ्या काळात स्ट्रॉबेरीचे उत्पादन वाढल्यावर मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्याचा आमचा मानस आहे.
- सिद्धेश ढवळे (तालुका कृषी अधिकारी)

आम्ही ही स्ट्रॉबेरी प्रायोगिक तत्त्वावर दुबईला पाठवली आहे. पहिल्या टप्प्यात १५ किलो, दुसऱ्या टप्प्यात १८ किलो आणि तिसऱ्या टप्प्यात २० किलोच्या आसपास स्ट्रॉबेरी निर्यात करण्याचा आमचा मानस आहे. ही स्ट्रॉबेरी दुबईच्या आयातदारांना आवडली असून चांगला प्रतिसाद दिला आहे.
- जयसिंग थोरवे (निर्यातदार)

Web Title: Bhimashankar Strawberry Bhimashankar strawberries reached Dubai! Record price received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.