जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील एका शेतातून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या बियाणांची किंमत साडेपाच लाख रुपये आहे. याबाबत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चुंचाळे येथे नितीन नंदलाल चौधरी याच्या शेतात प्रतिबंधित एचटीबीटी वाणाच्या कापूस बियाण्यांचा बेकायदेशीर साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस पथकाने सोमवार दि. २० रोजी पहाटे त्या ठिकाणी छापा मारला. तिथे ९ गोण्यांमध्ये ठेवलेले कापूस बियाणे ताब्यात घेतले.
पुढील कारवाईसाठी कृषी विभाग, बियाणे निरीक्षक यांना तिथे बोलवण्यात आले. त्यांनी त्या बियाण्याची तपासणी केली आणि ९ गोण्यांमध्ये प्रत्येकी ५० पाकिटे, असा एकूण ४५० पाकिटांच्या २०२ किलो वजनाचे प्रतिबंधित बियाणे आढळले. बियाणे निरीक्षकांनी त्यापैकी आवश्यक नमुने परीक्षणासाठी घेतले.
त्या पाकिटांवर उत्पादकाचे नाव, विक्रेत्याचे नाव, पत्ता, विक्री बॅच नंबर, किंमत आणि बियाणे कायद्यानुसार आवश्यक असलेला मजकूर कोठेही आढळला नाही. तालुका कृषी कार्यालयातील गुणनियंत्रण अधिकारी रामचंद्र मिठाराम पाटील यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून, चोपडा शहर पोलिस स्टेशन गुर.नं. १५३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३१८ (४), बियाणे कायदा १९६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्यावर्षीही हाच प्रकार
नितीन चौधरी यांच्या शेतातून मागील वर्षीदेखील अशाच प्रकारच्या बनावट प्रतिबंधित बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला होता. आता पुन्हा बोगस बियाण्यांचा साठा मिळून आला आहे.
हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Banned HTBT cotton seeds worth ₹5.25 lakh were seized from a farm in Chunchale, Chopda taluka. Police raided Nitin Chaudhary's farm and found 202 kg of illegal seeds. A case has been registered. Similar fake seeds were seized last year as well.
Web Summary : चोपड़ा तालुका के चुंचाले में एक खेत से 5.25 लाख रुपये के प्रतिबंधित एचटीबीटी कपास बीज जब्त किए गए। पुलिस ने नितिन चौधरी के खेत पर छापा मारा और 202 किलो अवैध बीज बरामद किए। मामला दर्ज कर लिया गया है। पिछले साल भी इसी तरह के नकली बीज जब्त किए गए थे।