lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेकडे केळी उत्पादकांची पाठ...

हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेकडे केळी उत्पादकांची पाठ...

Banana growers turn to climate-based fruit crop insurance scheme | हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेकडे केळी उत्पादकांची पाठ...

हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेकडे केळी उत्पादकांची पाठ...

आतापर्यंत १७ हजार शेतकऱ्यांचा विमा : गेल्यावर्षी ७७ हजार शेतकऱ्यांनी काढला होता विमा

आतापर्यंत १७ हजार शेतकऱ्यांचा विमा : गेल्यावर्षी ७७ हजार शेतकऱ्यांनी काढला होता विमा

शेअर :

Join us
Join usNext

हवामानावर आधारित फळ पीक विमा काढण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत असून, २७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात केवळ १७ हजार ३२७ केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा केळी पीक विम्याकडे झाली. पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. 

गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्यात ८१ हजार हेक्टर केळीचे क्षेत्र हवामानावर आधारीत फळ विम्याने संरक्षित होऊन, ७७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र, पीक विमा काढण्यासाठी केवळ चार दिवस शिल्लक असताना केवळ १७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. २७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत गेल्यावर्षी ४७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. दरम्यान, केळी पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी यंदा पाठ फिरवल्याचे चित्र असून, यासाठी अनेक कारणं समोर येत आहेत. विमा काढतात हे पाहणे महत्वाचे अजून दोन दिवसात किती शेतकरी ठरणार आहे.

• २७ ऑक्टोबरपर्यंत एकूण १७ हजार ३२७ शेतकयांनी पीक विमा काढला आहे.

• यामध्ये १२ हजार ४३३ कर्जदार तर ४ हजार ८९४ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

• आतापर्यंत १८ हजार ४२० हेक्टर क्षेत्र पीक विम्याने संरक्षित झाले आहे.

केळी पीक विम्याकडे पाठ फिरविण्याची कारणं

  • गेल्या वर्षी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात चौकशी झाली. यामुळे यंदा केळी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली.
  • गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे केळीची लागवड जास्त झाली.तर यंदा कमी पाऊस झाल्यामुळे लागवड क्षेत्र कमी होऊ शकते. यामुळे पीक विमा काढणाऱ्यांची संख्या कमी झाली असावी.
  • गेल्या वर्षी ज्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्या शेतकन्यांना अद्यापही पीक विम्यासाठीची नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे यंदा पीक विमा काढणाऱ्यांच्या संख्येत घट आली.
  • डिसेंबर, जानेवारीपासून जे शेतकरी केळीची लागवड करतात, ते शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची भिती असल्याने.
  • भाडेकरारावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी करार पत्र भरून द्यावे लागत आहे. त्यामुळे देखील पीक विमा काढणाऱ्या शेतकयांच्या संख्येवर परिणाम झाला आहे.

Web Title: Banana growers turn to climate-based fruit crop insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.