पारंपरिक शेतीत दिवसेंदिवस मजुरांची समस्या बिकट होत चालली आहे. ज्यामुळे अल्प मेहनतीत उत्तम परतावा देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कळ वाढला आहे.
असेच एक पीक म्हणजे बांबू शेती होय. बांबू शेतीचे शेतकऱ्यांना विविध फायदे आहेत. ज्यात उत्तम परताव्याच्या आर्थिक फायद्यांसह शेतकऱ्यांचा मजुरांवर होणाऱ्या खर्चातही बचत होते.
यासोबत आणखी बांबू शेतीचे नेमके फायदे कोणकोणते आहेत त्याविषयीची परिपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
✦ बांबू शेतीचे शेतकऱ्यांना होणारे फायदे
• जास्त किड व बुरशीचा प्रादुर्भाव नसल्यामुळे कीटकनाशक व बुरशी नाशक फवारणी आवश्यक नाही.
• खुरपणी, कोळपणी, नांगरणी इत्यादींची आवश्यकता नाही.
• पारंपारिक शेतीसाठी लागणारे मजूर लागत नाही.
• शेतीची राखण करणे अत्यल्प खर्चात शक्य.
• बांबू तोडणीस ठराविक कालावधी नाही.
• कमी जास्त पाऊस आणि वातावरण बदल यांचा बांबू वाढीवर विपरीत परिणाम होत नाही.
• ४० ते १०० वर्ष आयुष्यमान त्यामुळेच दरवर्षी होणारा लागवड खर्च कमी होतो.
• बांबूचा प्रक्रिया उद्योगात उपयोग होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी विशिष्ठ एका बाजारपेठेवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
✦ बांबू शेतीचे आर्थिक फायदे
• एक एकर बांबू लागवडीपासून दरवर्षी सुमारे ४० टन उत्पादन मिळते. ज्याची किंमत ४००० रु. ते २५००० रु. प्रति टन आहे.
• लागवडीपासून ३ ते ४ वर्षात उत्पादन सुरु होते आणि बांबूचे उत्पादन सुरु होईपर्यंत सुरुवातीच्या दोन वर्षात आंतरपीक घेता येते.
• बांबूची तोड चौथ्या वर्षापासून प्रत्येक वर्षी करण्यात येते व पुढील ३५ ते १०० वर्षे किंवा अनिश्चित काळासाठी करता येईल.
• लाकडातील प्रत्येक वस्तु बांबू पासून तयार केली जाऊ शकते.
• ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याची क्षमता.
• बांबू जनावरांसाठी चारा म्हणून देखील उपयुक्त आहे.
• बांबूपासून बायो- इथेनॉल, बायो-सीएनजी गॅस निर्माण करण्यासाठी अमर्याद मागणी.
लेखन व शब्दांकन
डॉ. संतोष चव्हाण
विषय विशेषज्ञ उद्यानविद्या
डॉ प्रवीण चव्हाण
विषय विशेषज्ञ कृषि विस्तार
संस्कृति संवर्धन मंडळ संचालित, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड.
हेही वाचा : Benefits Of Bamboo : बहूउपयोगी बांबू आहे सर्वांगीण फायद्याचा; वाचा सविस्तर माहिती