Join us

अवकाळीचा फटका; पण चारा पाणी टंचाईतून काहीअंशी होणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 10:16 IST

चारा, पाण्याच्या टंचाईतून होणार सुटका

तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे तीव्र होत असतानाच अवकाळीने अनेक भागांत धुमाकूळ केला. मात्र या मागील चार दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे काहीअंशी दिलासा देखील दिला आहे. या पावसामुळे उन्हाळी ज्वारी, बाजरी तसेच भाजी पिकांचे नुकसान झाले. असे असलेतरी काही प्रमाणात चारा, पाण्याच्या टंचाईतून सुटका होणार आहे.

जिल्ह्यात चार दिवसात सरासरी १६.५ मिमी पावसाची नोंद प्रशासनाकडे झाली. गुरुवारी जिल्ह्यातील धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्या, यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नकसान झाले. धारूर तालुक्यातील सोनीमोहा, अंबेवडगाव, चौंडी, धुनकवड परिसरात मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले तर धारूर तालक्यातील आंबेवडगाव येथील लेंडी नदीला पूर आला.

दुसरीकडे गेवराई तालुक्यातील फळबागांना फटका बसला. वीज कोसळून एक महिला ठार झाली तर एक मुलगा जखमी झाला. परळी तालुक्यात चार दिवसात गाय, बैल, म्हैस वीज पडल्याने दगावले. गुरुवार आणि शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्यातही अवकाळीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. शुक्रवारी मध्यरात्री बीड परिसरात अवकाळी पावसाने तासभर हजेरी लावली

हे ही वाचा - शेतकऱ्यांनो लेकीच्या नावाने पोस्टाच्या या योजनेत खाते उघडा होईल मोठा फायदा

चारा-पाण्याची तात्पुरती सोय होणार

अवकाळी पावसामुळे मागील पंधरवड्यात वाढलेला उष्णतेचा पारा काहीसा कमी झाला. या पावसामुळे धारूर, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच येत्या काही दिवसा उगवण होणाऱ्या चाऱ्याची सोय होणार आहे.

टॅग्स :पाऊसशेतकरीदुग्धव्यवसायशेतीबीड