Join us
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर उपबाजार समिती आवारात उद्या शेतीमालाचे लिलाव बंद

By मुक्ता सरदेशमुख | Updated: September 3, 2023 20:13 IST

विंचूर उपबाजार समिती आवारात उद्या   कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव बंद असणार आहेत. जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर ...

विंचूर उपबाजार समिती आवारात उद्या  कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव बंद असणार आहेत. जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे. यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना यलाठी चार्जचा निषेध करण्यासाठी निफाड पूर्व भागातील गावे बंद करण्याचे आवाहन करण्यात आले असून विंचूर उपबाजार समितीमधील कांदा व भुसार मालाचे लिलाव सोमवारी (दि. 4) रोजी बंद राहणार असल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने सांगितले आहे.

काय आहे जाहीर सूचना?

 "सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना जाहीर करण्यात येते की, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यासाठी निफाड पुर्व सकल मराठा समाज समितीने निफाड पुर्व भागातील गावे बंद ठेवून मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे निफाड पुर्व सकल मराठा समाज समितीचे पत्रानुसार विंचूर उप बाजार आवारावरील कांदा व भुसार,  या शेतीमालाचे लिलाव सोमवार दि. ०४/०९/२०२३ रोजी बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. "- सभापती , कृऊबास, लासलगाव, नाशिक        

टॅग्स :मार्केट यार्डनाशिकबाजार समिती वाशिमशेतकरीकृषी उत्पन्न बाजार समिती, कळमनाशेती क्षेत्रकांदा