lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची तुम्हाला माहिती आहे का?

Are you aware of Pradhan Mantri Suraksha Bima Yojana? | प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची तुम्हाला माहिती आहे का?

२ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मोफत, मजूरांसाठी, कामगारांसाठी महत्त्वाची योजना...

२ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मोफत, मजूरांसाठी, कामगारांसाठी महत्त्वाची योजना...

शेअर :

Join us
Join usNext

असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई- श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यावर नोंदणी करणाऱ्या कामगारांना एकही पैसा न भरता दोन लाखांचे विमा कवच दिले जाते. त्यांना अपघात प्रसंगी आणि दवाखान्यात उपचारासाठीचा उपक्रम त्यात जोडलेला आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मोफत देण्यात आलेला आहे.

नोंदणी दरम्यान पूर्ण डाटा सरकारकडे लिंक असून, त्याचा तुम्हाला फायदा होतो. शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या कल्याणकारी योजनेत लाभधारकांनी आपल्या नावाची ई-श्रम नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करून घ्यावी, अशी जनजागृती केली जात आहे.

काय आहे ई-श्रम पोर्टल?

ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यावर सर्वप्रथम ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जाये लागेल. त्यावर संगणकावर ई-श्रम अॅप्लिकेशनवर नोंदणी होते किंवा एखाद्या सेंटरवरही नोंदणी करू शकता. आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईलवर ही नोंदणी होते. त्याचे संदेश येतात.

हंगामी मजुरांनी फायदा घ्यावा...

सरकारने हंगामी मजुरांसाठी ई-श्रम नोंदणी सुरू केलेली आहे. त्यांना त्या बदल्यात बांधकाम साहित्य व इतर योजना देखील दिल्या जातात. आरोग्य विमा देखील २ लाखांपर्यंत मोफत असून, काम करताना अपघात झाल्यास त्याचे प्राण वाचण्यासही हातभार लागतो. - कामगार कल्याण अधिकारी

ई-श्रम पोर्टलवर दीड लाख कामगारांची नोंदणी

आधारकार्ड व मोबाईल नंबर त्यासोबत लिंक करणे जरुरी आहे. शहरात दीड लाखापेक्षाही अधिक कामगारांनी ई-श्रम नोंदणी केलेली आहे. एक पैसाही न भरता हा अपघात विमा यात जोडलेला आहे. अतिगंभीर प्रसंगी हा मदतीला येतो.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी कशी कराल?

स्वतःच्या मोबाईलवर अॅप्लिकेशन डाऊनलोड करून किंवा सेतू सेंटरवरही आधारकार्डचा नंबर जोडून नोंदणी करता येते. असंघटित कामगारांसाठी ही आरोग्य संजीवनीच असल्याचे मानले जाते.

नोंदणीसाठी निकष काय?

ई-श्रम पोर्टलवर कुणीही असंघटित क्षेत्रातील १८ वर्षावरील कुणीही मजूर नोंदणी करू शकतो. ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यावर आरोग्यविषयक योजनेचे लाभ मिळतात.

Web Title: Are you aware of Pradhan Mantri Suraksha Bima Yojana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.