Join us

राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४८० कोटी देण्यास मान्यता; मदत वाटप सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 08:44 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे.

मुंबई : अतिवृष्टी आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागातील जिल्ह्यांसाठी ४८० कोटी ३७ लाख रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यामध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशीम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यासाठी ही मदत देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे.

अमरावती विभागातीलअकोला जिल्ह्यासाठी ९१ कोटी १२ लाख ५८ हजारबुलढाणा जिल्ह्यासाठी २८९ कोटी २७ लाख २८ हजारवाशीम जिल्ह्यासाठी ३४ कोटी ६४ लाख ८४ हजारजालन्यासाठी ८३ लाख ८४ हजारहिंगोलीसाठी ६४ कोटी ६१ लाख ८३ हजारअशी एकूण ४८० कोटी ५० लाख ३८ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे.

◼️ वरील जिल्ह्यांतील ५ लाख ३७ हजार ३७८ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी ६ लाख ७२ हजार ८६६ शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे.◼️ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झाल्यानंतर एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येत आहे.

अधिक वाचा: आता खरेदीखतापूर्वीच जमिनीची हद्द कायम होणार; काय आहे निर्णय? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Approves ₹480 Crore Aid for Rain-Affected Farmers

Web Summary : Maharashtra government approves ₹480 crore aid for farmers in Amravati and Chhatrapati Sambhajinagar divisions due to crop damage from excessive rainfall and floods. Akola, Buldhana, Washim, Jalna, and Hingoli districts will benefit, with payouts underway based on NDRF norms for assessed losses on up to three hectares of land.
टॅग्स :शेतकरीशेतीपूरपाऊसपीकराज्य सरकारसरकारअमरावतीबुलडाणावाशिमजालनाहिंगोलीअकोला