Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या विभागीय कार्यालय कोल्हापूरातील चंदगड येथे मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 10:37 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू फळ पिकाचे उत्पादन विचारात घेता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथेही स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

राज्यातील काजू फळ पिकाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची स्थापना संदर्भाधीन दि. १६ मे, २०२३ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामध्ये काजू मंडळाच्या कामकाजाच्या दृष्टीने विविध निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करणे यासाठी काजू मंडळाचे मुख्यालय, वाशी नवी मुंबई येथे तर विभागीय कार्यालय, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे राहील असे नमूद करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू फळ पिकाचे उत्पादन विचारात घेता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथेही स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्रातील काजू फळ पिकाच्या विकासाकरिता संदर्भाधीन दि. १६ मे, २०२३ च्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या “महाराष्ट्र राज्य काजू मंडळा” चे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

टॅग्स :सरकारसरकारी योजनाराज्य सरकारकोल्हापूरचंदगडशेतकरीफळे