lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत लाभार्थ्यांकरिता निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता

सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत लाभार्थ्यांकरिता निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता

Approval of disbursement and expenditure of funds to the beneficiaries under Silk Samagra-II Yojana | सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत लाभार्थ्यांकरिता निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता

सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत लाभार्थ्यांकरिता निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता

केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) "सिल्क समग्र-२" (ISDSI) ही योजना सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यात राबविण्यास दि.०९.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) "सिल्क समग्र-२" (ISDSI) ही योजना सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यात राबविण्यास दि.०९.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) "सिल्क समग्र-२" (ISDSI) ही योजना सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यात राबविण्यास दि.०९.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

सदर योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना केंद्र हिस्सा ₹ २२९.४३३४ लक्ष व त्यास पुरक राज्य हिस्सा ₹१२८.६२५९ असा एकूण ₹३५८.०५९३ लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती संचालक रेशीम यांनी संदर्भाधीन दि.११.०३.२०२४ रोजीच्या पत्रान्वये केली आहे.

केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) "सिल्क समग्र-२" (ISDSI) या योजनेंतर्गत सन २०२२-२३ मधील सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठीचा अखर्चित केंद्र हिस्सा ₹२२९.४३३४ लक्ष व त्यास पूरक राज्य हिस्सा ₹१२८.६२५९ लक्ष असा एकूण ₹३५८.०५९३ लक्ष इतका निधी या लिंकवरील शासन निर्णय मधील तक्त्यात नमूद केलेल्या बाबींसाठी वितरीत व खर्च करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

सदर योजनेंतर्गत अनुदान देताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख कृषि संजिवणी योजना (पोक्रा) व इतर शासकीय योजनेंतर्गत लाभ दिला नसल्याची खात्री करून तसेच बाबनिहाय अनुदानाची द्विरूक्ती होणार नाही याची खातरजमा करून पात्र लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्याची कार्यवाही संचालक (रेशीम) यांनी करावी.

सदर योजनेचा लाभ डीबीटी प्रणालीच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे लाभार्थ्याना अदा करण्याची कार्यवाही करावी. सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी लाभ घेतलेल्या बाबीअंतर्गत उभारण्यात आलेल्या मालमत्तेचे जीओ टॅगीग करणे बंधनकारक राहील.

सदर योजनेच्या लाभ दिल्यांनतर/अंमलबजावणीनंतर प्रकल्प/लाभार्थी केंद्रित घटकांचे व्हिडिओ दस्तऐवजीकरण करणे बंधनकारक असून याबाबतची कार्यवाही संचालक (रेशीम) यांनी करावी. असे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Approval of disbursement and expenditure of funds to the beneficiaries under Silk Samagra-II Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.