मुंबई: नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याला तातडीने मदत देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
त्यानुसार राज्यात जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
राज्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामात बियाणे व अनुषंगिक बाबींची खरेदी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे.
या अंतर्गत प्रती हेक्टरी १० हजार रुपये प्रमाणे (तीन हेक्टर मर्यादेत) १,७६५ कोटी २२ लाख ९२ हजार इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली आहे.
सातारा जिल्हा १४ हजार ६४३ शेतकऱ्यांच्या ५ हजार ८०३.५५ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी पाच कोटी ८० लाख ३६ हजार रुपये.
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील १६ लाख ५९ हजार २९३ शेतकऱ्यांच्या १२ लाख ११ हजार ५९४ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी १२११ कोटी ५४ लाख ९० हजार रुपये.
अमरावती जिल्ह्यातील चार लाख ९० हजार ९११ शेतकऱ्यांच्या पाच लाख ४७ हजार ८७६.६५ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी ५४७ कोटी ८७ लाख ६६ हजार रुपये निधी वितरणास मान्यता दिली आहे.
दोन ते तीन हेक्टर मर्यादित (वाढीव एक हेक्टरसाठी)◼️ जून ते सप्टेंबर २०२५ कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागातील जिल्ह्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १२० कोटी ३३ लाख ८७ हजारांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.◼️ यामध्ये वर्धा जिल्ह्यातील २१ हजार ३९२ शेतकऱ्यांच्या १५ हजार ५१२.११ हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी १३ कोटी २० लाख ३८ हजार रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.◼️ अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ जिल्ह्यातील ८६ हजार ५८२ शेतकऱ्यांच्या ७१ हजार ३३३.९० हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी ६१ कोटी ८१ लाख ६४ हजार रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.◼️ धाराशिव जिल्ह्यातील ६३ हजार ४१४ शेतकऱ्यांच्या ४३ हजार १६२.३१ हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी ४२ कोटी ४५ लाख ९३ हजार रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अधिक वाचा: रब्बी हंगामातील 'या' सहा पिकांसाठी विमा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Maharashtra government sanctioned ₹2,540 crore to support farmers affected by heavy rains. Funds will aid in purchasing seeds for the upcoming Rabi season. Nashik, Amravati, and Satara districts are among the beneficiaries, receiving substantial financial assistance based on crop damage assessments.
Web Summary : महाराष्ट्र सरकार ने भारी बारिश से प्रभावित किसानों के लिए ₹2,540 करोड़ की सहायता मंजूर की। आगामी रबी सीजन के लिए बीज खरीदने में धन मदद करेगा। नासिक, अमरावती और सतारा जिले फसल क्षति के आकलन के आधार पर पर्याप्त वित्तीय सहायता प्राप्त करने वाले लाभार्थियों में शामिल हैं।