Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture : कृषी विभागातील 'निविष्ठा व गुणनियंत्रण'मधील 'त्या' गैरव्यवहाराची होणार विशेष चौकशी

Agriculture : कृषी विभागातील 'निविष्ठा व गुणनियंत्रण'मधील 'त्या' गैरव्यवहाराची होणार विशेष चौकशी

Agriculture: Special inquiry to be conducted into 'those' irregularities in 'input and quality control' in the Agriculture Department | Agriculture : कृषी विभागातील 'निविष्ठा व गुणनियंत्रण'मधील 'त्या' गैरव्यवहाराची होणार विशेष चौकशी

Agriculture : कृषी विभागातील 'निविष्ठा व गुणनियंत्रण'मधील 'त्या' गैरव्यवहाराची होणार विशेष चौकशी

आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत निविष्ठा व गुणनियंत्रण विभागातील वरिष्ठ अधिकारी किरण जाधव आणि अन्य अधिकाऱ्यांवर आरोप केले होते.

आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत निविष्ठा व गुणनियंत्रण विभागातील वरिष्ठ अधिकारी किरण जाधव आणि अन्य अधिकाऱ्यांवर आरोप केले होते.

शेअर :

Join us
Join usNext

Pune : मागील काही महिन्यांपूर्वी कृषी विभागात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची कृषी विभागातीलच एका संचालकाकडून चौकशी करण्यात आली होती. पण त्यानंतर आता याच अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी विशेष चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून माजी अधिकाऱ्यांकडून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत निविष्ठा व गुणनियंत्रण विभागातील वरिष्ठ अधिकारी किरण जाधव आणि अन्य अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. तर त्यानंतर झालेल्या प्राथमिक चौकशीत सदर अधिकारी दोषी आढळून आल्याची माहिती आहे. तर त्यानंतर कृषी आयुक्तांनी किरण जाधव याना दक्षता पथकातून हटवण्याची शिफारस कृषी सचिवांकडे केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पण या सर्व प्रकारानंतर आता विशेष चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रकरणामध्ये प्राथमिक चौकशीसाठी विशेष चौकशी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. उमाकांत दांगट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून हा अहवाल एका महिन्यात कृषी आयुक्तांकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तर त्यानंतर आयुक्तांनी हा अहवाल तपासून शासनाकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण खाते हे मलाईदार खाते म्हणून प्रचलित आहे. या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे प्रकार यापूर्वीही अनेकदा आढळून आले आहेत. तर उपसंचालक किरण जाधव यांच्यावर आमदाराने भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर पुन्हा हे खाते चर्चेत आले होते. डॉ. दांगट यांच्या चौकशीत कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Agriculture: Special inquiry to be conducted into 'those' irregularities in 'input and quality control' in the Agriculture Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.